घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटCoronavirus: अमेरिकेत करोनाचे १ लाख रुग्ण; मृतांचा आकडा १,६९५ वर

Coronavirus: अमेरिकेत करोनाचे १ लाख रुग्ण; मृतांचा आकडा १,६९५ वर

Subscribe

अमेरिकेनंतर इटली, चीन आणि स्पेन या देशांना करोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे.

करोना विषाणू इटली, जर्मनी, स्पेनसह अमेरिकेमध्ये कहर करत आहे. जगभरात करोनाचे सर्वात जास्त रुग्ण हे अमेरिकेत आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनूसार अमेरिकेत करोनाचे १ लाख ४ हजार १४२ रुग्ण असून १ हजार ६९५ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २ हजार ५२२ जण बरे झाले आहेत. अमेरिकामध्ये शुक्रवारी १८ हजार ६९१ नवे रुग्ण आढळले. तर ४०० जणांचा शुक्रवारी मृत्यूही झाला. न्यूयॉर्क शहरात सर्वाधिक ४६ हजार २६२ रुग्ण आढळले आहेत. तर ६०६ जणांचा मृ्त्यू झाला आहे. न्यूयॉर्कमध्ये आणखी तीन आठवडे करोनाचे रुग्ण वाढणार असल्याची शक्यता न्यूयॉर्कचे राज्यपाल अँड्र्यू कुओमो यांनी वर्तवली आहे.


हेही वाचा – Coronavirus: इटलीत करोनाचा कहर; एका दिवसात ९१९ जणांचा मृत्यू

जगभरात करोनाचे ५ लाख रुग्ण

करोनाने जगभर आपले हात पाय पसरले आहेत. करोनाचे जगभरात ५ लाख ९७ हजार २६२ रुग्ण आहेत. तकर २७ हजार ३६५ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १ लाख ३३ हजार ३६३ जण बरे झाले आहेत. जगभरात सर्वात जास्त करोनाचे रुग्ण अमेरिकेत आहेत. त्यापाठोपाठ इटली ८६ हजार ४९८ रुग्ण आहेत.

- Advertisement -

corona patients world wide

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -