घरCORONA UPDATECoronaVirus: जगभरात आतापर्यंत करोनाचे १ लाखाहून अधिक रुग्ण रिकव्हर!

CoronaVirus: जगभरात आतापर्यंत करोनाचे १ लाखाहून अधिक रुग्ण रिकव्हर!

Subscribe

सध्या जगभरात करोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. या जागतिक महामारीमुळे जगभरातील अनेक देशांना आर्थिक मंदीचा सामना करावा लागणार आहे. पाहायला गेले तर दिवसागणिक करोनाबाधित संख्या दुप्पट वाढत आहे. आतापर्यंत जगभरात ३ लाख ७९ हजार ३७५ करोनाबाधित रुग्ण आढळले आहे. यापैकी १६ हजार ५०९ करोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तसंच १९५ देशांपैकी १७३ देशांवर करोनाचा सावट आहे. त्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र एक दिलासा देणारी बाब म्हणजे या करोना आजारावर कोणतीही लस नसतानाही अनेक जण करोनावर मात करत आहेत. आतापर्यंत जगभरात १ लाख ४८४ जणांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे सध्या करोना व्हायरसला घाबरून न जाता त्याच्यावर मात करेन हा आपल्यासाठी सर्वात मोठा टास्क आहे.

करोनामुळे चीनपेक्षा दुप्पट मृत्यू हे इटलीमध्ये झाले आहेत. अमेरिका, स्पेन, जर्मनी आणि इराण यासारख्या देशांमध्ये करोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जगसमोर हे मोठं संकट उभ राहिलं आहे.

- Advertisement -

आतापर्यंत चीनमध्ये ८१ हजार १७१ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर इटलीमधील करोनाबाधितांचा आकडा हा ६३ हजार ९२७वर पोहोचला आहे. चीनमध्ये करोनामुळे ३ हजार २७७ जणांचा मृत्यू झाला असून इटलीमध्ये ६ हजार ७७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे भारतीयांना इटलीप्रमाणे परिस्थिती होऊ नये याकरिता केंद्र सरकार आणि राज्य सरकार सूचनांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.


हेही वाचा – CoronaVirus: करोनामुळे संपूर्ण जगावर आर्थिक मंदीचे संकट – आयएमएफ

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -