घरदेश-विदेश2023 मध्ये 10 लाख नोकऱ्या देणार, मोदींकडून पाच कलमी योजना जारी

2023 मध्ये 10 लाख नोकऱ्या देणार, मोदींकडून पाच कलमी योजना जारी

Subscribe

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२३ सालापर्यंत १० लाख लोकांना रोजगार देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी विशेष पोर्टल, दोन महिन्यांचे टार्गेट, सचिव स्तरावर साप्ताहिक आढावा बैठक, संपूर्ण दिनदर्शिका तयार करणे, सेवानिवृत्तीमुळे रिक्त असलेल्या पदांच्या संख्येची आकडेवारी गोळा करणे आदी पावले उचलण्यात आली आहेत. २०२३ च्या अखेरीस १० लाख लोकांना नोकऱ्या देणे हे त्याचे एकमेव उद्दिष्ट आहे. देखरेखीची जबाबदारी पंतप्रधान कार्यालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यावर सोपवण्यात आली आहे. बेरोजगारीची समस्या निर्माण झाल्यानंतर २०२३ च्या अखेरीस मोदी सरकारने केंद्राच्या अंतर्गत विविध विभागांमध्ये १० लाख रिक्त पदे भरण्याची घोषणा केली होती.

हेही वाचा ब्लू टिकसाठी ‘या’ दिवसापासून मोठी रक्कम वसूल केली जाणार; एलॉन मस्कची माहिती

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेरोजगारी आणि नोकऱ्यांचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मोदी यांनी केंद्र सरकारमधील 10 लाख रिक्त पदे भरण्याची घोषणा केली होती. 2023 च्या अखेरीस ही पदे भरण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यादृष्टीने ऑक्टोबरमध्ये पहिला ‘रोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 75 हजार तरुणांना नियुक्तीपत्रे दिली होती. मोदी सरकारने 10 लाख तरुणांना नोकऱ्या देण्याचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी 5 कलमी योजना तयार केली आहे.

हेही वाचा – ‘दहशतवादी, खुनी म्हणून न बघता आमच्याकडे पीडित म्हणून पाहा’; राजीव गांधींच्या मारेकऱ्याची विनंती

- Advertisement -

काय आहे पाच कलमी कार्यक्रम?

  1. पहिल्या पायरीअंतर्गत, ‘व्हॅकन्सी स्टेटस पोर्टल’ नावाचे आंतर-सरकारी पोर्टल सुरू करण्याची योजना आहे. येथे सर्व मंत्रालये आणि विभागांद्वारे रिक्त पदांचा डेटा अपलोड केला जाईल.
  2. दुसऱ्या टप्प्यांतर्गत, प्रत्येक मंत्रालय आणि विभागाकडून नोडल अधिकारी नियुक्त केले जातील, जे पोर्टल नियमितपणे अपडेट करतील.
  3. सर्व मंत्रालये आणि विभागांसाठी दोन महिन्यांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यासोबतच 2023 अखेरपर्यंतचे संपूर्ण कॅलेंडरही तयार करण्यात आले आहे.
  4. ऑफर आणि अपॉइंटमेंट लेटरसाठी एकात्मिक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. येत्या काही महिन्यांत जारी करण्यात येणार्‍या नियुक्ती पत्रांबाबत अपडेट जारी करण्याचे निर्देश सर्व मंत्रालयांना देण्यात आले आहेत.
  5. 2023-24 या आर्थिक वर्षात, सर्व मंत्रालये आणि विभागांना सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या पदांची माहिती वेळेपूर्वी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, जेणेकरून त्या रिक्त जागा भरता येतील.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -