घरताज्या घडामोडीजगातील दिग्गज टेक कंपन्यांची कमान भारतीयांकडे, पराग अग्रवाल यांच्यासह भारतीय वंशाचे १०...

जगातील दिग्गज टेक कंपन्यांची कमान भारतीयांकडे, पराग अग्रवाल यांच्यासह भारतीय वंशाचे १० सुपर बॉस

Subscribe

मायक्रोब्लॉगिंग प्लेटफॉर्म ट्विटरचे नवे सीईओ भारतीय वंशाचे आणि मुंबईकर असलेले पराग अग्रवाल झाले आहेत. त्यांनी जॅक डोर्सी यांची जागा घेतली आहे. त्यामुळे आता पराग अग्रवाल यांचे नाव भारतीय वंशाच्या त्या नागरिकांच्या यादीत सामिल झाले आहे, जे जगातील दिग्गज टेक कंपनीच्या सीईओ पदावर आहेत. पराग अग्रवाल यांच्याप्रमाणे भारतीय वंशाचे  लोकं जगातील दिग्गज कंपनींचा कारभार पाहत आहेत. कोण आहेत हे भारतीय वंशाचे सुपर बॉस पाहा..

सुंदर पिचाई (Sundar Pichai)

- Advertisement -

सुंदर पिचाई यांनी आयआयटी मद्रासमधून शिक्षण पूर्ण केले होते. २००४ साली सुंदर पिचाई यांनी गूगल ज्वाईन केले. त्यानंतर २०१५ साली सुंदर पिचाई यांची गूगलच्या सीईओ पदी नियुक्ती झाली. २०१९ मध्ये त्यांना गूगलची मूळ कंपनी अल्फाबेटच्या सीईओ पदाची जबाबदारी दिली. पिचाई यांनी गूगल टूलबारचे लाईक्स, क्रोमचे डेव्हलपमेंट आणि गूगल ब्राउजरवर काम केले आहे. २०१२ साली त्यांनी प्रोडक्ट डेव्हलपमेंटचे सीनिअर वीपी बनवले गेले. मग २ वर्षांनंतर सुंदर पिचाई यांना गूगल आणि अँड्रॉई़ड स्मार्टफोन ओएसचे प्रोडक्ट चीफ बनवले.

- Advertisement -

सत्या नडेल्ला (Satya Nadella)

२०१४ साली भारतीय वंशाचे सत्या नडेल्ला यांना मायक्रोसोफ्टचे सीईओ बनवले. १९९२ पासून सत्या नडेल्ला मायक्रोसोफ्टमध्ये काम करत आहेत. मायफ्रोसोफ्टच्या मेजर प्रोडक्ट्सवर सत्या यांनी काम केले आहे. यामुळे कंपनीला क्लाउड कॉम्युटिंगवर मूव करण्यास मदत मिळाली होती. त्यांनी मनिपल इन्स्टिट्यूट टेक्नोलॉजी कर्नाटक इथून शिक्षण घेतले आहे.

अरविंद कृष्णा (Arvind Krishna)

अरविंद कृष्णा हे IBMचे सीईओ आहेत. एप्रिल २०२०मध्ये अरविंद कृष्णा यांची IBM कंपनीच्या सीईओ पदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात १९९०पासून IBMमधून केली होती. आयआयटी कानपूरमधून अरविंद कृष्णा यांनी शिक्षण घेतले आहे. इलिनॉय युनिव्हर्सिटीतून अरविंद कृष्णा यांची पीएचडी झाली आहे.

शांतनू नारायण (Shantanu Narayen)

२००७पासून शांतनू नारायण हे अडोबचे सीईओ आहेत. १९९८ साली त्यांनी अडोब कंपनी सीनिअर वीपी म्हणून ज्वाईन केली होती. ते प्रोडक्ट डेव्हलपमेंट पाहत होते. २००५ साली त्यांना कंपनीच्या सीओओ पदी नियुक्त केले आणि दोन वर्षानंतर सीईओ पदाची जबाबदारी त्यांना देण्यात आली. उस्मानिया युनिव्हर्सिटी हैदराबादमधून शांतनू नारायण यांनी शिक्षण पूर्ण केले आहे.

रंगराजन रघुराम (Rangarajan Raghuram)

एप्रिल २०२१मध्ये रंगराजन रघुराम यांना व्हीएमवेअरच्या सीईओपदी नियुक्त करण्यात आले. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात २००३पासून व्हीएमवेअर कंपनीपासून केली होती. रंगराजन रघुराम आयआयटी बॉम्बेचे माजी विद्यार्थी आहेत.

रेवती अद्वैती (Revathi Advaithi)

रेवती अद्वैती यांना २०१९ मध्ये फ्लेक्स Flex कंपनीच्या सीईओ पदाची जबाबदारी दिली. त्यांनी बॅचलर डिग्री बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अँड सायन्स, पिलानीमधून घेतली आहे. तर एमबीए थर्डरबर्ड स्कूल ऑफ ग्लोबल मॅनेजमेंटमधून केले आहे.

निकेश अरोरा (Nikesh Arora)

२०१८ साली निकेश अरोरा यांना पॉलो अल्टो नेटवर्कसच्या सीईओ पदावर नियुक्त करण्यात आले होते. त्यांनी बॅचलर डिग्री बनारस हिंदी युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून घेतली होती.

जयश्री उल्लाल (Jayshree Ullal)

जयश्री उल्लाल २००८ साली अरिस्ता नेटवर्क कंपनीच्या सीईओ बनल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये अरिस्ता आपला आयपीओ घेऊन आला होता.

अंजली सूद (Anjali Sud)

२०१७ साली अंजली सूद यांना व्हिडिओ प्लॅटफॉर्म विमियोच्या सीईओ पदाची जबाबदारी दिली. यापूर्वी सूद यांनी अॅमेझोन आणि टाईम वॉर्नरमध्ये काम केले आहेत. अंजली सूद यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीए केले आहे.

अमान भूटानी (aman bhutani)

अमान भूटानी यांची २०१९ साली गोडॅडीच्या सीईओ पदी नियुक्ती करण्यात आली. त्यांनी बॅचलर डिग्री दिल्ली युनिव्हर्सिटीमधून घेतली होती. तर त्यांनी एमबीए लँकेस्टर युनिव्हर्सिटीतून केले होते.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -