Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश उदयनिधी स्टॅलिनचा शिरच्छेद करणाऱ्याला 10 कोटी रुपये, अयोध्येतील पुजाऱ्याची घोषणा

उदयनिधी स्टॅलिनचा शिरच्छेद करणाऱ्याला 10 कोटी रुपये, अयोध्येतील पुजाऱ्याची घोषणा

Subscribe

नवी दिल्ली : तामिळनाडूचे मुख्यमंत्री यांचे एम. के. स्टॅलीन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबद्दल केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद देशभरात पडत आहेत. या प्रकरणी अयोध्येतील तपस्वी छावनी मंदिराचे मुख्य पुजारी परमहंस आचार्य यांनी उदयनिधी स्टॅलिन यांचे शिरच्छेद करणाऱ्याला 10 कोटी रुपयांच्या बक्षिस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. यानंतर देशात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

उदयनिधी स्टॅलिन केलेल्या वक्तव्यावर पुजारी परमहंस आचार्य म्हणाले, “सनातन धर्माची सुरुवात आणि अंतही नाही. सनातन धर्म कधीही नष्ट झालेला नाही.” पुढे पुजारी परमहंस आचार्य म्हणाले, “उदयनिधी स्टॅलिन यांचे शिरच्छेद करून माझ्याकडे आणल्यास त्या व्यक्ती मी 10 कोटी रुपयांचे बक्षिस देण्याची घोषणा करत आहे. जर कोणाला स्टॅलिनला मारण्याची हिंमत नसेल. तर मी स्वत: स्टॅलिनला शोधून मारून टाकेन”, असे वादग्रस्त वक्तव्य पुजाऱ्यांनी केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – प्रकाश आंबेडकरांचे उदयनिधी स्टॅलिनच्या ‘त्या’ वक्तव्याला समर्थन; ट्वीट करत सांगितला ‘सनातन’ शब्दाचा अर्थ

परमहंस आचार्यांची वादग्रस्त वक्तव्य

- Advertisement -

पुजारी परमहंस आचार्य यांनी अनेकदा वादग्रस्त व्यक्तव्य केली आहे. यात रामचरितमानसावर टीका करणाऱ्या समाजवादी पार्टीचे नेते स्वामी प्रसाद मौर्या यांचे देखील शिरच्छेद करणे आणि अभिनेत्री दिपिका पादुकोनने पठाण सिनेमात भगव्या रंगाची बिकीनी परिधान केली. तेव्हा पुजारी परमहंस आचाऱ्यांनी अभिनेता शाहरूख खानला जिवंत जाळणाऱ्याला रोख रक्कम देण्याची घोषणा केली होती.

हेही वाचा – सनातन धर्माबद्दल केलेल्या ‘या’ वक्तव्यावर उदयनिधी स्टलिन ठाम; वाचा नेमके प्रकरण काय

काय आहे संपूर्ण प्रकरण

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचा मुलगा आणि राज्य सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी शनिवारी राजधानी चेन्नईमध्ये एका सभेला संबोधित केले. यामध्ये त्यांनी सनातन धर्माबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. उदयनिधी यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरिया, कोरोना सारख्या आजारांसोबत केली. ते म्हणाले, ‘मच्छर, डेंग्यू, कोरोना हे असे रोग आहेत, ज्यांचा आम्ही फक्त विरोध करु शकत नाही. तर यांचे समूळ उच्चाटन करावे लागते. सनातन धर्म देखील असाच आहे. सनातनचा फक्त विरोध करुन चालणार नाही, तर त्याला मुळातून संपवावे लागणार आहे.’

- Advertisment -