घरCORONA UPDATELockDown: परदेशी पाहुण्यांनी मोडला नियम; पोलिसांनी दिली ही भन्नाट शिक्षा

LockDown: परदेशी पाहुण्यांनी मोडला नियम; पोलिसांनी दिली ही भन्नाट शिक्षा

Subscribe

उत्तराखंडमधील हृषिकेश येथील गंगा नदीच्या तिरावर बसून लॉकडाऊनचा नियम मोडल्याने परदेशी पाहुण्यांनी शिक्षा पूर्ण केली.

देशात लॉकडाऊन असताना कोणालाही, कुठेही फिरण्याची परवानगी नाही. मात्र अशातच काही परदेशी पाहुण्यांनी हा लॉकडाऊनचा नियम मोडल्याची घटना उत्तराखंडमधील हृषिकेशमधून समोर आली आहे. या परदेशी पाहुण्यांना पोलिसांनी चक्क ५०० वेळा मला माफ करा (आय एम सॉरी) लिहीण्याची शिक्षा दिली. पोलिसांनी दिलेल्या या आगळ्यावेगळ्या शिक्षेची चर्चा सध्या होत आहे. हृषिकेशमधील साधारण १० परदेशी पाहुण्यांनी लॉकडाऊनचा नियम मोडला असून त्यांना गंगा नदीच्या किनारी बसवून पोलिसांनी त्यांच्याकडून मला माफ करा, असे लिहून घेतले.

हेही वाचा – परदेशी कंपन्यांना भारतीय कंपनींचा ताबा घेण्याची परवानगी देऊ नका – राहुल गांधी

- Advertisement -

विविध देशातील परदेशी पाहुण्यांना शिक्षा 

लॉकडाऊनच्या काळात उत्तराखंडमधील लोकांनाही पोलिसांनी घरातच बसण्याचे आवाहन केले आहे. केवळ सकाळी ७ ते दुपारी १ च्या वेळेतच त्यांना जीवनावश्यक वस्तूंसाठी घराबाहेर पडता येणार आहे. त्या व्यतिरिक्त कोणीही विनाकारण बाहेर फिरताना दिसला, तर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करत आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र अशातच अमेरिका, ऑस्ट्रेलिया, मेक्सिको आणि इस्त्राइलवरून भारतात आलेल्या काही परदेशी पाहुण्यांनी या नियमाचा भंग केल्याने त्यांना ही अनोखी शिक्षा देण्यात आली. त्यांना मी लॉकडाऊनचा नियम पाळला नाही, मला माफ करा, असे ५०० वेळा एका कागदावर लिहायला लावले.

- Advertisement -

सध्या देशात कोरोनाची स्थिती आणखीनच बिघडत चालली आहे. ताज्या आकडेवारीनुसार देशात ८ हजार ४४७ कोरोनाचे रुग्ण झाले आहेत. तर यातील ७ हजार ४०९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच २७३ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे लोकांनी लॉकडाऊनचे नियम काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -