घरताज्या घडामोडीउत्तर प्रदेशमध्ये प्रवाशांनी भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली उलटून 9 जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशमध्ये प्रवाशांनी भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली उलटून 9 जणांचा मृत्यू

Subscribe

प्रवाशांनी भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली उलटल्याने 9 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. ट्रॅक्टर ट्रॉली पाण्याने भरलेल्या तळ्यात उलटला. या ट्रॉलीमधून 46 जण प्रवास करत होते.

प्रवाशांनी भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली उलटल्याने 9 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. ट्रॅक्टर ट्रॉली पाण्याने भरलेल्या तळ्यात उलटला. या ट्रॉलीमधून 46 जण प्रवास करत होते. यापैकी 34 जणांना वाचवण्यात यश आले आहे. (10 killed in Uttar Pradesh as tractor trolley overturns falls into pond)

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये हा भीषण अपघात घडला. या ट्रॅक्टर ट्रॉलीतून 46 लोक प्रवास करत होते. एका तळ्याजवळून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टरची ट्रॉली थेट तळ्यात कोसळली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी स्टेट डिझास्टर रिलिफ फोर्सची (SDRF) टीम दाखल झाली. तसेच, नेमका हा अपघात कसा झाला याचा तपास सुरू असून प्रत्यक्षदर्शींच्या प्रतिक्रियाही घेतल्या जात आहेत.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. या अपघातात 8 महिला आणि 2 मुलांचा मृत्यू झाला. गंभीर जखमींपैकी एकाला किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच, काही जखमींवर इटौंजा येथील कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये उपचार सुरू असल्याचे समजते. शिवाय, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत दिली जात आहे.

बांगलादेशमध्ये नदीत बोट उलटून 23 जणांचा मृत्यू

- Advertisement -

बांगलादेशमध्ये नदीत बोट उलटून 23 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी बोट उलटल्याची ही धक्कादायक घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, डझनहून अधिक लोक बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेची माहिती पोलिसांनी रविवारी दिली. या घटनेची माहिती देताना उत्तर पंचगढचे जिल्हा प्रशासक झहरुल इस्लाम यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या मृतदेहांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. बेपत्ता लोकांसाठी बचावकार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.


हेही वाचा – तुरुंगातून सुटून भोंदूबाबा लागला पैशांचा पाऊस पाडण्याच्या तयारीला, पोलिसांनी केले गजाआड

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -