घरताज्या घडामोडी१९ वर्षांच्या तरुणाने मित्रासोबत बिझनेस केला सुरू; ५ महिन्यात उभी केली ४३००...

१९ वर्षांच्या तरुणाने मित्रासोबत बिझनेस केला सुरू; ५ महिन्यात उभी केली ४३०० कोटींची कंपनी!

Subscribe

मैत्री खूप अनमोल असते. मैत्री शिवाय आयुष्य जगणे कठीण असते. काही जणांची मैत्री दीर्घकाळ असते तर काही जणांची अल्पावधीसाठी असते. पण आयुष्यात मैत्रीचे नाते असतेच. अशीच घट्ट मैत्री असलेल्या दोघा तरुणांनी बिझनेस करण्याचा धाडसी निर्णय घेतला. यात यश मिळेल की नाही याचा विचार न करता त्यांनी एक स्टार्ट कंपनी जेप्टो सुरू केली. अवघ्या काही महिन्यातच दोघांच्या हाती यश आले. ५ महिन्यात दोघांनी ४३०० कोटींची कंपनी उभी केली. या दोघा मित्रांची यशस्वी कहानी वाचा….

काही जणांचे स्वप्न स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये (Stanford University) शिक्षण घेण्याचे असते. परंतु बालपणीचे मित्र आदित पलीचा (Aadit Palicha) आणि कैवल्य वोहरा (Kaivalya Vohra) यांचे स्वप्न काही वेगळे होते. १९ वर्षांच्या आदित पलीने आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्टॅनफोर्डमधील शिक्षण सोडून कैवल्यसोबत बिझनेस लाईनमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. दोघांना या मार्गावर यश मिळाले. इंस्टंट ग्रॉसरी डिलिव्हरी करणारी स्टार्टअप कंपनी जेप्टो आदित आणि कैवल्यने सुरू केली. अवघ्या ५ महिन्यात ४३०० कोटींची ही कंपनी बनली.

- Advertisement -

जेप्टोला फंडिंग राउंडमध्ये ५७० मिलियन डॉलर म्हणजे जवळपास ४,३०० कोटी रुपये मिळाले. वाय कम्बिनेटरच्या (Y Combinator) या राउंडमध्ये जेप्टोला १०० मिलियन डॉलरची फंडिंग मिळाली. दीड महिन्यापूर्वी पहिल्यांदा जेप्टोची किंमत २२५ मिलियन डॉलर होती, तेव्हा स्टार्टअपने ६० मिलियन डॉलरची फंडिंग मिळवली होती. त्यानंतर जेप्टोला वाय कम्बिनेटरला कंटीन्यूटी फंडसोबत ग्लेड ब्रुक कॅपिटल पार्टनर्स, नेक्सस वेंचर्स पार्टनर्स, ब्रेयर कॅपिटल आणि सिलिकॉन व्हॅली इन्वेस्टर लॅची ग्रुममधून निधी मिळाला. वाय कम्बिनेटर, ग्लेड ब्रुक कॅपिटल, नेक्सस वेंचर्स, ग्लोबल फाउंडर्स आणि लॅची ग्रुमसारख्या गुंतवणूकदारांनी जेप्टामध्ये यापूर्वी पैसे लावले होते.

जेप्टो कंपनी १० मिनिटात ग्रॉसरी डिलिव्हरी करण्याचा दावा करते. याच वर्षीय जेप्टोने मुंबईत काम करणे सुरू केले. आता बंगळुरू, दिल्ली, गुरुग्राम, चेन्नईमध्येही जेप्टो सर्व्हिस देते. येणाऱ्या दिवसात कंपनी हैदराबाद, पुणे, कोलकातासारख्या शहरात सेवा सुरू करणार आहे. कंपनीकडे आता १०० मायक्रो वेअरहाऊस आहेत. आता जेप्टो ताजे उत्पादन, रेशनचे सामान, स्नॅक्स, पर्सनल केअर सारख्या सेगमेंटमध्ये २,५०० हून अधिक सामानांची डिलिव्हरी करत आहे.

- Advertisement -

इंस्टंट डिलिव्हरी मार्केटमध्ये जेप्टोसाठी ग्रोफर्स आणि डुंजो सारख्या कंपनीचे आव्हान आहे. अलीकडेच ग्रोफर्सने ब्रँडचे नाव बदलून ब्लिंकइट केले होते. ही कंपनी काही मिनिटात वस्तू डिलिव्हर करत आहे. या कंपनीला सॉफ्टबँककडून इन्वेस्टमेंट मिळाली आहे. गुगल सपोर्टेड डुंजो पण इंस्टंट डिलिव्हरी सेगमेंटमध्ये काम करते.


हेही वाचा – Covid-19 cruise case: जगातील सर्वात मोठ्या क्रूझवर कोरोनाचा शिरकाव! ४८ प्रवासी पॉझिटिव्ह


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -