Coronavirus: …यामुळे १० मिनिटांत तुम्हाला होऊन शकतो कोरोना!

highest single day spike of 178 deaths reported in maharashtra today

कोरोना विषाणूच्या संकटात घरी राहणे सर्वात सुरक्षित का आहे?, सरकार, डॉक्टर आणि वैज्ञानिक सोशल डिस्टन्सिंग का ठेवायला सांगत आहेत? हे तुम्हाला ही बातमी वाचल्यानंतर समजेल. सध्या कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी कोणतीच लस किंवा औषध तयार झाले नाही आहे. त्यामुळे सध्या घरात राहणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे हाच कोरोना विषाणू रोखण्यासाठी महत्त्वाचा उपाय आहे. एखादा माणूस खोकतो किंवा शिंकतो तेव्हा ह्या विषाणूचा हवेतून प्रादुर्भाव होतो. श्वास घेणे, बोलणे, खोकणे आणि शिंकणे या प्रक्रिये मार्फत अनेक सूक्ष्म जलकण हवेत पसरत असतात. यामुळे निरोगी असलेला व्यक्ती कोरोनाग्रस्त होऊ शकतात.

दरम्यान एका नव्या अभ्यासातून असे समोर आले आहे की, खोकला आणि शिंकणे यासह इतर गोष्टींद्वारे आपल्या शरीराबाहेर पडणारे सूक्ष्म जलकणामुळे आपल्याला दहा मिनिटांत कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. मॅसॅच्युसेट्स युनिव्हर्सिटीचे वैज्ञानिक एरिन ब्रोमेज यांनी एक नवीन फॉर्म्युला तयार केला आहे. आपल्याला कोरोना विषाणूचा संसर्ग किती संक्रमित करतो हे आपल्या संक्रमित ठिकाणी घालवलेल्या वेळेनुसार समजते, असे या नव्या फॉर्म्युल्यानुसार मांडण्यात आले आहे.

वैज्ञानिक एरिन ब्रोमेज यांनी सांगितले की, मी संवाद आणि सामान्य परिस्थितीमध्ये श्वास घेताना होणार संक्रमणांचा अभ्यास केला आहे. जर एखादा निरोगी व्यक्तीने कोरोनाबाधित व्यक्तीसह सोशल डिस्टन्सिंग ठेवले नाही तर १० मिनिटांत त्या व्यक्तीला संसर्ग होऊ शकतो, असे समोर आले.

सर्वसामान्य परिस्थितीत एक व्यक्ती श्वास घेताना ५० ते ५० हजार जलकण आपल्या नाकातून आणि तोंडातून सोडत असतो. मग हे हवेत पसरतात. ज्याकडे आपले लक्ष अजिबात जात नाही. परंतु आपण त्यांना पाहू शकतो. आपण जेव्हा आपल्या चष्मावर आपल्या तोंडातली वाफ सोडतो तेव्हा आपल्या त्याच्यावर जमा झालेले कण दिसतात. ग्रॅव्हिटीमुळे वातावरण हे कण चालत असताना जमीनवर पडतात. पण काहीवेळा ते हवेत तरंगत असतात कारण त्याचे वजन कमी असते.

एरिन म्हणाले की, समजा एखाद्या व्यक्तीने श्वास घेताना प्रति मिनिटाला २० सूक्ष्म जलकण बाहेर सोडले तर कोरोना विषाणूच्या केसमध्ये तो १००० सूक्ष्म जलकण बाहेर सोडले. जर त्याच्या जवळ एक निरोगी व्यक्ती असेल तर त्याला पुढील १० मिनिटात कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकेल. श्वास घेण्याच्या तुलनेत १० पटीने जास्त जलकण बोलता बाहेर पडतात. म्हणजे प्रति मिनिट २०० जलकण. म्हणजे कोरोनाबाधित व्यक्ती बोलतो तेव्हा १० हजार विषाणूचे जलकण हवेत पसरतात. त्यामुळे विषाणूचा आणखीन प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण होतो. कोरोना विषाणू हा १४ मिनिटे हवेत तरंगत राहतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही संक्रमित व्यक्तीच्या समोर बसून १० मिनिटे बातचित कराल तेव्हा तुम्हाला १० मिनिटात कोरोनाची लागण होईल. त्यामुळे सध्या सोशल डिस्टन्सिंग पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे.


हेही वाचा –  राजीव गांधी पुण्यतिथी: शेकडो काँग्रेस कार्यकर्ते जमले एकत्र; सोशल डिस्टन्सिंगचा उडवला फज्जा!