घरदेश-विदेशगुजरातमध्ये बनावट दारूमुळे 10 जणांचा मृत्यू, 20 जण रुग्णालयात दाखल

गुजरातमध्ये बनावट दारूमुळे 10 जणांचा मृत्यू, 20 जण रुग्णालयात दाखल

Subscribe

गुजरातमधील बोटाड जिल्ह्यातील रोजिद गावात बनावट दारूमुळे 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 20 जणांची तब्येत बिघडली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सोमवारी रात्री सांगितले की, काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणात पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे. गुजरात दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि अहमदाबाद क्राइम ब्रँच या प्रकरणाचा तपासात करत आहेत. गुजरातचे पोलिस महासंचालक (डीजीपी) आशिष भाटिया यांनी सांगितले की, सकाळी दोन जणांचा मृत्यू झाला होता, तर पाच जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.दरम्यान सोमवारी रात्री उशिरा अधिकाऱ्यांनी उपचारादरम्यान आणखी तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली.

बोटाडचे पोलिस अधीक्षक करणराज वाघेला यांनी सोमवारी रात्री उशिरा पत्रकारांना बोटाड जिल्ह्यातील पाच आणि अहमदाबाद जिल्ह्यातील धंधुका तालुक्यातील दोन गावातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. किमान 20 लोक विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत, त्यापैकी बहुतेकांना भावनगर येथील सर तख्तसिंहजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे, असे सांगितले.

- Advertisement -

वाघेला म्हणाले, गरज पडल्यास पोलीस खुनाचा  गुन्हा ही दाखल करतील. गुजरात एटीएस सोबतच अहमदाबाद क्राइम ब्रँचही आमच्या तपासात सहभागी झाली असून गुन्हेगारांना पकडण्यात आले आहे. तत्पूर्वी, उपचार घेत असलेल्या पीडितेच्या पत्नीने पत्रकारांना सांगितले की, रविवारी रात्री रोजीद गावात दारू प्यायल्यानंतर तिच्या पतीची प्रकृती बिघडली.

त्याच वेळी, आणखी एक बळी हिंमतभाई, जो आता बरा होत आहे, असा दावा केला आहे. रविवारी रात्री एका तस्कराकडून विकत घेतलेली दारू पिल्याने किमान 15 लोक आजारी पडले. पोलिस महानिरीक्षक, अशोक कुमार यादव यांनी सायंकाळी बोताड सिव्हिल हॉस्पिटलला भेट दिली. या घटनेच्या तपासासाठी पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -