चंदीगड : देशभरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांचा प्रश्न अधिक बिकट होत चालला आहे. या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला जात नाही. यामुळे सर्वसामान्य नागिरकांना भटक्या कुत्र्यांच्या त्रास सहन करावा लागतो. देशातील बहुतांश भागात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे अनेक लोक जखमी होतात. तर कधी कधी कुत्रा हल्ल्यात लोकांचा मृत्यूमुखी देखील होतो. एकाद्या व्यक्तीला कुत्रा चावल्यास त्याला राज्य सरकारकडून नुकसान भरपाई देण्याची जबाबदार राहील, असा महत्त्वाचा निर्णय पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने दिला आहे.
कुत्रा चावल्यास दाताच्या प्रत्येक खुणेमागे किमान 10 हजार रुपये आणि प्रत्येकी 0.2 सेमी जखमेसाठी किमान 20 हजार रुपये राज्य सरकारने भरपाई देण्याचा आदेश न्यायालयाने यावेळी दिला आहे. पंजाब, चंदीगड आणि हरियाणा या राज्यात भटके कुत्रे चावल्याच्या तब्बल 193 याचिकांवर न्यायालयात सुनावणी सुरू होती. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने हा महत्त्वाचा निर्णय दिला आहे.
हेही वाचा – वाघ बकरी चहाचे मालक पराग देसाईंचं निधन; भटक्या कुत्र्यांनी केला होता हल्ला
न्यायालयाकडून समितीची स्थापन करण्याचे आदेश
यावेळी न्यायालयाने भटक्या कुत्र्याचा हल्लांच्या प्रकरणांमध्ये भरपाई निश्चित करण्यासाठी संबंधित उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे आदेशही न्यायालयाकडून देण्यात आले आहे. या समितीमध्ये कुत्रे, गाय, बैल, गाढव, नीलगाय म्हैस या जनावरांचा आणि त्याचबरोबर इतर जंगली, पाळीव प्राण्यांचा ही समावेश आहे.
हेही वाचा – बाळासाहेबांसाठी नारायण राणे झाले ‘सुरक्षारक्षक’; डिसेंबरच्या थंडीत बंगल्याबाहेर रात्रभर होते उभे
कुत्र्यांच्या हल्लात वाघ बकरी टी ग्रुपचे कार्यकारी संचालकांचा मृत्यू
भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवावारून मोठ्या प्रमाणात वाद सुरू असल्यामुळे न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे. नुकतेच वाघ बकरी टी ग्रुपचे कार्यकारी संचालक 49 वर्षी पराग देसाई यांचा कुत्र्यांच्या हल्ल्यानंतर ब्रेन हॅमरेज होऊन मृत्यू झाला होता. या घटनेनंतर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणी जोर धरू लागली. मिळालेल्या माहितीनुसार, इस्कॉन आंबळी रोडवर मॉर्निंग वॉक करताना पराग देसाईंवर भटक्या कुत्र्यांनी हल्ल्या केला. यातून स्वत: ला वाचवताना पळत असताना त्यांचा तोल गेला आणि ते जमिनीवर पडले. त्यांच्या मेंदुला गंभीर दुखापत झाली. तत्काळ त्यांना शेल्बी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यानंतर त्याला शस्त्रक्रियेसाठी झायडस रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे 22 ऑक्टोबर रोजी त्यांचा मृत्यू झाला.