घरदेश-विदेशचक्क दहा वर्षीय मुलाने केला ‘हा’ विक्रम

चक्क दहा वर्षीय मुलाने केला ‘हा’ विक्रम

Subscribe

पंजाबमधील १० वर्षीय अर्शदीप सिंग याला उत्कृष्ट वन्यजीवन छायाचित्रकाराचा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळवणारा सर्वात लहान फोटोग्राफर तो ठरला आहे.

अचूक नजर, तत्परता आणि सर्वात महत्वाचे एकाग्रता फोटोग्राफी करणाऱ्यासाठी या गोष्टीची गरज असते. चांगली फोटोग्राफी करणे हे अनेकांना शक्य होत नाही मात्र एकदा फोटोग्राफी जमायला लागली की मग त्याशिवाय दूसरी मजा कशात वाटत नाही. फोटोग्राफी शिकण्यासाठी वयाची अट नसते. कोणत्याही वयोगटातील फोटोग्राफर उत्तम फोटोग्राफी करु शकतो हे दाखवणारे उदाहरण नुकतेच पंजाब येथे बघायला मिळाले. येथील १० वर्षीय अर्शदीप सिंग याने काढलेल्या फोटोला नुकताच उत्कृष्ट छायाचित्राचा पुरस्कार मिळाला आहे. अर्शदीपने काढलेल्या “पाईप आऊल”(पाईपात बसलेले घुबड) या छायाचित्रासाठी पुरस्कार देण्यात आला. ब्रिटेन नैसर्गिक इतिहास संग्रहालयाकडून हा पुरस्कार देण्यात आला. संग्रहालयाकडून दरवर्षीय जगभरातील वन्यजीवन छायाचित्रकारांसाठी स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदा स्पर्धेचे ५३ वे वर्ष होते. आपल्या मिळालेल्या पुरस्कारामुळे खूप आनंद होत असल्याची प्रतिक्रिया अर्शदीपने दिली आहे.

Arshdeep Singh
अर्षदीप सिंग (सौजन्य- इंडियन एक्सप्रेस)

स्पर्धेचे स्वरुप

या स्पर्धेत भाग घेणाऱ्या लहानमुलांसाठी अंडर ११-१४, अंडर १५-१७ ची वयोमर्यादा आहे. यामुलांमध्ये अर्शदीपचे छायाचित्र उत्कृष्ठ ठरले. अर्शदीपदीपचे वडीलही फोटोग्राफर आहेत. वयाच्या सहाव्या वर्षापासूनच अर्शदीपला फोटो काढण्याची आवड असल्याचे त्यांनी सांगितले. पंजाबमधील कपूरखला येथून आपल्या वडिलांसोबत गाडीने जात असताना अर्शदीपला पाईपात बसलेले घुबड आढळले. त्याने वडिलांना गाडी थांबवण्यास सांगितली आणि तत्काळ घुबडांचे फोटो काढले. सेंकदातील काही भागातच त्याने फोटो काढला. याफोटोला त्याच्या वडिलांनी स्पर्धेसाठी पाठवला होता.

- Advertisement -

 

यापूर्वीही मिळालेत अनेक पुरस्कार 

अर्शदीपला फोटोग्राफीसाठी अनेक बक्षीसे मिळाली आहेत. नुकताच त्याला जूनियर एशियन वाइल्डलाईफ फोटोग्राफर पुरस्कारही देण्यात आला. या व्यतिरिक्त अर्शदीप लोनली प्लॅनेट युके, लोनली प्लॅनेट जर्मनी,लोनली प्लॅनेट इंडिया,बीबीसी वाइल्डलाईफ इत्यादी मध्येही काम केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -