घरदेश-विदेशBJP outlines 2024 roadmap: 2024 च्या निवडणुकीत भाजपसाठी 'या' 100 जागा ठरणार...

BJP outlines 2024 roadmap: 2024 च्या निवडणुकीत भाजपसाठी ‘या’ 100 जागा ठरणार निर्णायक; आतापासूनच मोर्चेबांधणी

Subscribe

विशेष म्हणजे देशभरातील शंभर लोकसभा मतदारसंघांतील 74 हजार मतदान केंद्रांवर पक्षाची पकड घट्ट करण्यासाठी चार सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याची जबाबदारी बी. जे. पांडा, दिलीप घोष, सरचिटणीस सी. टी. रवी आणि अनुसूचित जाती मोर्चाचे लाल सिंह आर्य यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

नवी दिल्लीः पाच राज्यांतील निवडणुकीनंतर आता भाजपनं 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्या दृष्टीनं भाजपनं मोर्चे बांधणीलाही सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ज्या ठिकाणी पक्षाची अवस्था चांगली नाही, तिथे मजबूत फळी उभारण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. तसेच संघटनात्मक स्तरावरील रिक्तपदांची जबाबदारी चांगल्या कार्यकर्त्यांवर सोपविली जाणार आहे.

विशेष म्हणजे देशभरातील 100 लोकसभा मतदारसंघांतील 74 हजार मतदान केंद्रांवर पक्षाची पकड घट्ट करण्यासाठी चार सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याची जबाबदारी बी. जे. पांडा, दिलीप घोष, सरचिटणीस सी. टी. रवी आणि अनुसूचित जाती मोर्चाचे लाल सिंह आर्य यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. ही योजना कार्यान्वित करण्यासाठी ही टीम पुढील तीन महिन्यांत संपूर्ण भारत दौरा करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या चार सदस्यांच्या समितीची सोमवारी पक्षाच्या दिल्ली मुख्यालयात बैठक झाली असता पुढील आठवड्यात भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा हे मिशन अधिकृतपणे सुरू करतील, अशी अपेक्षा आहे.

- Advertisement -

2016 मध्ये भाजपने 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी अशीच योजना राबवली होती, त्या जागांवर भाजपनं अखेरीस मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. त्याच्या रणनीतीचा एक भाग म्हणून ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ आणि ईशान्येकडील सहा राज्यांमध्ये पक्ष कधीही जिंकू शकला नाही, असे सुमारे 115 मतदारसंघ ओळखले जातात. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या योजनेत असे 100 मतदारसंघ भाजपने शोधले असून, बहुतेक दक्षिणेकडील आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये आहेत.

तसेच भाजपचा जास्त प्रभाव नसलेल्या मतदारसंघांवर मतदान केंद्रांवर पकड मजबूत करण्यासाठी विशेष मोहीम राबविली जाणार असून, त्यासाठी वरिष्ठ नेत्यांचे दौरे होणार आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघांवर पक्षाचं काम कमी का पडलं, याचाही आढावा घेतला जाणार आहे.

- Advertisement -

हेही वाचाः जून महिन्यात कोरोनाची चौथी लाट, टास्क फोर्सचा मास्क सक्तीचा प्रस्ताव

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -