घरदेश-विदेशकुमारस्वामींसाठी १०० झाडांची कत्तल

कुमारस्वामींसाठी १०० झाडांची कत्तल

Subscribe

कर्नाटकच्या कोडगुचे पोलीस उपायुक्तांनी धोकादायक झाडांना कापून टाका असा आदेश बुधवारी दिला. त्यानंतर या परीसरातील जवळपास १०० झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात आली

पर्यावरणाचा होणारा ऱ्हास पाहता प्रत्येक राज्याने वृक्ष लागवडीचा निर्णय घेतला खरा पण कर्नाटकात मात्र राजरोसपणे १०० झाडांची कत्तल झाली आहेत. झाडांची ही कत्तल कुमारस्वामींसाठी करण्यात आल्याचे समजत आहे. खुद्द मुख्यमंत्र्यासाठी झाडांची ही कत्तल करण्यात आली त्यामुळे या मागचे कारण काय असा प्रश्न असताना आताही कत्तल कुमारस्वामी यांच्या सुरक्षित प्रवासासाठी करण्यात आल्याचे देखील समजत आहे.

नेमकं प्रकरण काय?

कुमारस्वामी धार्मिक कामासाठी कर्नाटकच्या कोडगु जिल्ह्यात आज जाणार आहेत. त्यांचा हा प्रवास सुखरुप व्हावा. यासाठी धोकादायक झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात आली. कर्नाटकच्या कोडगुचे पोलीस उपायुक्तांनी धोकादायक झाडांना कापून टाका असा आदेश बुधवारी दिला. त्यानंतर या परीसरातील जवळपास १०० झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात आली, अशी माहिती डेक्कन हेराल्डने दिली आहे. या संदर्भात पोलीस आयुक्तांना विचारणा केल्यावर अशा प्रकारचा कोणताही आदेश दिला नसल्याचे सांगितले. शिवाय, गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकमधील मदिकेरी परिसरातील पावसाने केलेले नुकसान पाहता मुख्यमंत्री जाणार त्यामार्गावरील पडलेल्या झाडांचा आढावा घ्या, असे देखील पोलीस आयुक्त श्रीविद्या यांनी सांगितले.

- Advertisement -

वनविभागाची परवानगी नाही?

झाडांची कत्तल करताना वन विभागाची कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही, असे वन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. शिवाय या परिसरातील मदिकेरी हा भाग भारतातील स्कॉटलँड म्हणून प्रसिद्ध आहे. कावेरी नदीचा उगम येथून होते. त्यामुळे पर्यटकांची या ठिकाणी गर्दी असते, आधीच या मुसळधार पावसामुळे येथील रस्त्यांचे नुकसान झाले आहे. शिवाय अनेक झाडे देखील उन्मळून पडली आहेत. आधीच पर्यावरणाची इतकी हनी झालेली असताना आता या १०० झाडांची कत्तल वनविभागाची परवानगी न घेता करणे चुकीचे आहे, असे देखील वनअधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -