Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश 'मन की बात'चा 100 वा भाग 'या' कारणामुळे असणार विशेष, वाचा...

‘मन की बात’चा 100 वा भाग ‘या’ कारणामुळे असणार विशेष, वाचा…

Subscribe

नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदी विराजमान झाल्यापासून त्यांनी 'मन की बात' या कार्यक्रमाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांशी संवाद साधण्यास सुरूवात केली आहे. येत्या 30 एप्रिलला या कार्यक्रमाचा 100 वा भाग प्रसारित करण्यात येणार आहे.

नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदी विराजमान झाल्यापासून त्यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांशी संवाद साधण्यास सुरूवात केली आहे. येत्या 30 एप्रिलला या कार्यक्रमाचा 100 वा भाग प्रसारित करण्यात येणार आहे. या 100 व्या भागाची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेली आहे. कारण या 100 व्या भागानिमित्त केंद्र सरकारने 100 रुपयांचे नाणे चलनात आणण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून चर्चेत असलेला मन की बातच्या या भागासाठी भाजप कार्यकर्त्यांकडून देखील विशेष तयारी करण्यात येत आहे.

याआधी देखील अनेकदा 100 रुपयांचे नाणे चलनात आणण्यात आले आहे. पण यंदा तांबे, रजत, निकिल आणि जस्त या चार धातूंपासून हे नाणे तयार करण्यात येणार आहे. साधारणतः 44 मिलीमीटरचे नाणे तयार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. या नाण्यामध्ये पुढील बाजूस अशोक स्तंभ असणार आहे. तर त्याच्या खाली “सत्यमेव जयते” असे लिहिलेले असेल. तसेच नाण्याच्या डाव्या बाजूला देवनागरीमध्ये ‘भारत’ आणि उजव्या बाजूला इंग्रजीमध्ये ‘INDIA’ असे लिहिलेले असेल, अशी माहिती देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे मन की बातच्या 100 व्या भागानिमित्त हे नाणे चलनात आणण्यात येणार असल्याने या नाण्यावर 100 व्या भागाचे प्रतिक म्हणून मायक्रोफोनचे चित्र आणि त्यावर 2023 असे लिहिण्यात येईल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नाण्याच्या वरच्या बाजूला देवनागरीमध्ये ‘मन की बात 100’ आणि इंग्रजीमध्ये ‘Mann Ki Baat 100’ असे सुद्धा लिहिलेले असेल.

- Advertisement -

दरम्यान, याआधी देखील केंद्र सरकारकडून 100 रुपयांचे नाणे चलनात आणण्यात आले होते. 2010, 2011, 2012, 2014 आणि 2015 या वर्षी सुद्धा 100 रुपयांचे नाणे चलनात आणण्यात आले होते. तर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीदिनानिमित्त सलग चार वर्षांसाठी 100 रुपयांचे नाणे चलनात आणण्यात आले होते.

एप्रिल महिन्याच्या शेवटच्या रविवारी म्हणजेच 30 एप्रिल 2023 ला ‘मन की बात’ या लोकप्रिय कार्यक्रमाचा 100 वा भाग प्रसारित करण्यात येणार आहे. हा भाग प्रसारित करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांकडून खूप मेहनत घेण्यात येत आहे. एक लाखापेक्षा अधिक मंडळींना बूथवर 100 वा भाग ऐकता येईल यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहे.


- Advertisement -

हेही वाचा – राजस्थान येथील पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या कार्यक्रम समितीच्या अध्यक्षपदी मुनगंटीवार यांची निवड

- Advertisment -