घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटCoronaVirus: १०१ वर्षांची कोरोनाबाधित वृद्ध महिला झाली रिकव्हर!

CoronaVirus: १०१ वर्षांची कोरोनाबाधित वृद्ध महिला झाली रिकव्हर!

Subscribe

जगभरात कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे जगभरात सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. तरीदेखील जगभरातील अनेक कोरोना बाधित रुग्ण हे कोरोनाशी दोन हात करून त्याच्यावर मात करत आहेत. अशी घटना नेदरलँड्समध्ये घडली आहे. नेदरलँड्स मधील कोरोना व्हायरस बाधित असलेली १०१ वर्षांची वृद्ध महिला रिकव्हर झाली आहे. तिच्यामुळे रुग्णालयाने ही आशेची ठिणगी असल्याचं सांगितलं. या कोरोना बाधित वृद्ध महिलेचे नाव जाहीर केले नसून ती गेले दीड आठड्यापासून रॉटरडॅम जवळच्या आयजेस्सलँड या हॉस्पिटमध्ये उपचार घेत होती. तिला श्वासोच्छवासाचा त्रास झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र त्यादरम्यान या वृद्ध महिलेची कोरोनाचा चाचणी केली त्यावेळेस तिचे पॉझिटिव्ह रिपोर्ट आले.

त्यानंतर तिला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते. आता ही वृद्ध महिला रिकव्हर झाली आहे. रुग्णालयाच्या संकेतस्थळावरून असं सांगण्यात आलं की, शतकानुशतः स्वतंत्रपणे राहणारी, घरी परत जाण्यापूर्वी ती नर्सिंग होममध्ये विश्रांती घेईल. या वृद्ध महिलेबद्दल फुफ्फुसतज्ज्ञ सुनील रामलाल यांनी सांगितलं की, ती एक कणखर स्त्री आहे. स्वतःच्या कोपर्यावर शिंकणे आणि योग्य अंतर ठेवणे अशा वैद्यकीय सल्ल्याने तिने पालन केल्याने मला खूप आनंद झाला आहे.

- Advertisement -

आतापर्यंत नेदरलँड्समध्ये १२ हजार ५९५ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी १ हजार ३९ रुग्णांचा बळी गेला आहे. तर २५० रुग्ण रिकव्हर झाले आहेत.


हेही वाचा – लॉकडाउनची ऑर्डर असूनही तबलीगी जमातीचा कार्यक्रम कसा चालला?

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -