घरदेश-विदेशKumbh Mela 2021: दुसऱ्या शाहीस्नानानंतर कोरोनाचा उद्रेक! १०२ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

Kumbh Mela 2021: दुसऱ्या शाहीस्नानानंतर कोरोनाचा उद्रेक! १०२ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

Subscribe

१०२ जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ

देशभरात कोरोनाचा कहर सुरू आहे, बाधितांचा धडकी भरवणारा वाढता आकडा समोर येत आहे. मात्र उत्तराखंडमधील हरिद्वार येथे सुरू असलेल्या महाकुंभवर त्याचा कोणताही परिणाम होत नसल्याचे चित्र सोमवारी शाही स्नानादरम्यान पाहायला मिळाले. देशभरातील साधुंचे आखाडे कुंभ मेळ्यात शाही स्नानासाठी हजेरी लावतात. यंदा देशावर कोरोनाचं सावट असताना देखील हरिद्वार येथील हर की पौडी भागात दुसऱ्या शाही स्नानासाठी साधु-संतांनी मोठी गर्दी केली होती. या शाहीस्नानादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले तर या शाहीस्नानानंतर कोरोनाचा उद्रेक झाला असून १०२ जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि कोरोनाचे नियमांना पायदळी तुडवत लाखोंच्या संख्येनं भाविक कुंभमेळ्यासाठी हजर होते. लाखोंच्या संख्येत भाविकांनी लावलेली हजेरी आणि झालेल्या प्रचंड गर्दीदरम्यान थर्मल स्क्रीनिंग आणि इतर उपाययोजना करण्यात राज्य सरकारला कोणतेही यश आले नसल्याचे दिसून आले. परंतु, शाही स्नानाच्या वेळी राज्य सरकारने केंद्राकडून जारी करण्यात आलेल्या सर्व सूचनांचे पालन केले असल्याचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांच्याकडून सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी झालेल्या दुसऱ्या शाही स्नानामध्ये ३१ लाखाहून अधिक भाविकांनी हजेरी लावली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आरोग्य विभागाची टीम कुंभमेळ्यात तैनात होती. रविवारी रात्री साडेअकरा वाजेपासून सोमवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत १८ हजारांहून अधिक भाविकांची कोरोना चाचणी करण्यात आली, यापैकी १०२ जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

उत्तराखंड पोलिसांसाठी मोठं आव्हान

कुंभमेळा आयोजकांसह प्रशासनाकडून कोरोना नियमांच पालन होईल किंवा थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था नसल्याचेही समोर आले. कुंभमेळ्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असताना देखील अनेक भाविक विना मास्क फिरताना दिसले तर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचा फज्जा उडवताना दिसले. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने उत्तराखंड पोलिसांसाठी हे मोठं आव्हान असल्याचे दिसतेय.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -