घरदेश-विदेशअरेच्चा! सीबीआयच चौकशीच्या फेऱ्यात; छापेमारीत सापडलेलं ४५ कोटींचं सोनं गायब

अरेच्चा! सीबीआयच चौकशीच्या फेऱ्यात; छापेमारीत सापडलेलं ४५ कोटींचं सोनं गायब

Subscribe

सीबीआयच्या चौकशीचे नाव ऐकले तरी अनेकजणांना घाम फुटतो. देशातील सर्वोच्च तपास यंत्रणा आणि केंद्र त्यांच्या फायद्यासाठी विरोधकांना धमकावण्यासाठी ज्या संस्थेचा वापर करते, ती संस्था सीबीआयच आता चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे. सीबीआय चौकशीच्या फेऱ्यात सापडण्याचे कारण म्हणजे छापेमारीत सापडेलं ४५ कोटींचे गायब झालेले सोने. हे सोने १०३ किलोंचे आहे. वजन करताना घोळ झाल्याचे कारण सीबीआयने दिले. मात्र, मद्रास उच्च न्यायालयाने तमिळनाडू सीबी-सीआयडीला या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

सीबीआयने २०१२ मध्ये तामिळनाडूतल्या सुराणा कॉर्पोरेशनवर छापा टाकला होता. या छाप्यामध्ये सीबीआयने तब्बल ४००.५ किलो सोने जप्त केले होते. तेव्हापासून हे सोने सीबीआयच्या ताब्यात होते. मात्र, आता या सोन्याचे पुन्हा एकदा वजन करण्यात आले. या वजनात तब्बल १०३ किलो सोने कमी असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. सीबीआयच्या ताब्यातील सोने गायब झाल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले. यानंतर आता न्यायालयाने चक्क सीबीआयच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सीबी-सीआयडी म्हणजेच राज्य सरकारचा गुन्हे अन्वेशन विभाग या प्रकरणाची चौकशी करणार आहे. सीबीआयने या चौकशीला विरोध केला आहे. मात्र न्यायालयाने कडक शब्दात फटकारले आहे. तसेच ही चौकशी एसपी दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अखत्यारित सीआयडीद्वारे केली जाईल, असे सांगितले. ही चौकशी ६ महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -