घरताज्या घडामोडीपीएम मोदींचा जगभरात डंका, आतापर्यंत 11 देशांनी दिलाय सर्वोच्च नागरी सन्मान, जाणून घ्या

पीएम मोदींचा जगभरात डंका, आतापर्यंत 11 देशांनी दिलाय सर्वोच्च नागरी सन्मान, जाणून घ्या

Subscribe

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फिजी आणि पापुआ न्यू गिनी देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मोदींना देशांकडून सन्मानित करण्याची ही पहिलीच वेळ नाही. तर आतापर्यंत 9 देशांनी मोदींचा सन्मान केला आहे.
फिजीचे पंतप्रधान सितिवेनी राबुका यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. मोदी हे जागतिक नेतृत्व असल्याचे सांगत त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. फिजी देशाचा हा सर्वोच्च पुरस्कार फिजीबाहेरच्या केवळ काहीच लोकांना देण्यात आला आहे.

- Advertisement -

2016 मध्ये सौदी अरेबियाने पंतप्रधान मोदींना ‘अब्दुलाझीझ अल सौद’ या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यानंतर देखील पुरस्काराची मालिका सुरूच राहिली. अमीर अमानुल्लाह खान पुरस्कार हा अफगाणिस्तानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.


2018 साली मोदी हे फिलिस्तीनच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांना ‘ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ फिलिस्तीन’ पुरस्कारने सन्मानित करण्यात आले होते. तसेच 2019 साली मोदींनी संयुक्त अरब अमीरातला भेट दिली होती. त्यावेळी त्यांना देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ जायद’ने सन्मानित करण्यात आले होते.

- Advertisement -

2020 साली अमेरिकेच्या ‘लीजन ऑफ मेरिट’पुरस्काराने सन्मानित केले. तर भूतानने 2021 साली मोदी यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘ऑर्डर ऑफ दी ड्रक गियल्पो’ पुरस्काराने सन्मानित केले होते.

फिजीच्या पंतप्रधानांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, हा सन्मान फक्त माझा नाही तर १४० कोटी भारतीयांचा आहे. भारत आणि फिजीचं जुनं नातं आहे. त्याबद्दल मी तुमचे आणि राष्ट्रपतींचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.


हेही वाचा : आता 1000 रुपयांची नोट परत येणार? RBIची नवी योजना काय?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -