घरताज्या घडामोडीटीएमसी नेत्याकडे सापडलं तब्बल ११ कोटींचं घबाड, आयकर विभागाची कारवाई

टीएमसी नेत्याकडे सापडलं तब्बल ११ कोटींचं घबाड, आयकर विभागाची कारवाई

Subscribe

पश्चिम बंगालच्या राजकारणातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पार्थ चॅटर्जी आणि त्यांच्याशी संबंधित शिक्षण घोटाळ्यानंतर टीएमसी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मुर्शिदाबादमधील टीएमसी आमदार झाकीर हुसैन यांच्या घरातून १०.९० कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. आयकर विभागाने काल बुधवारी रात्री झाकीर हुसैन यांच्या घरावर आणि त्यांच्या अनेक कारखान्यांवर छापे टाकले होते. यावेळी कोट्यवधींची रोकड आयकर विभागाकडून जप्त करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने एकूण २८ ठिकाणी छापे टाकले होते. या छाप्यात १५ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. झाकीर आमदार असलेल्या मुर्शिदाबादमधूनही ११ कोटी रुपये मिळाले आहेत. टीएमसी आमदाराचा बिडीचा मोठा व्यवसाय आहे. तसेच त्यांचे अनेक कारखाने देखील आहेत.

- Advertisement -

झाकीर हुसैन यांची रघुनाथगंजमध्ये राईस मिल आहे. तिथेही आयकर विभागाकडून छापा टाकण्यात आला. टीएमसी आमदाराच्या जवळच्या मित्राच्या घरावरही छापा टाकण्यात आला आहे. आता या तपासाचे काही फोटोज देखील समोर आले आहेत. त्या फोटोमध्ये नोटांचा डोंगर दिसत आहे. टेबलावर नोटांचे पाच मजले उभारण्यात आले आहेत. आमदार हुसैन यांनी तपास यंत्रणेला पूर्णपणे सहकार्य केल्याचे म्हटले आहे.

टीएमसी नेते कुणाल घोष यांनी या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. झाकीर हुसैन यांचा टीएमसीमध्ये येण्यापूर्वीच बिडीचा मोठा व्यवसाय होता. हा व्यवसायाचा प्रकार आहे, जिथे अधिक रोख आवश्यक आहे. कारण मजुरांना पैसे द्यावे लागतात. त्यात तफावत आढळल्यास तपास यंत्रणा कारवाई करेल असं घोष यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : दिलासादायक! किरकोळ महागाईचा दर वर्षभरात निचांकीवर


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -