घरक्राइमदिल्ली रेल्वे स्टेशनवर 15 दिवस 11 तोतया टीटीई ड्युटीवर; आरपीएफने घेतला ताब्यात

दिल्ली रेल्वे स्टेशनवर 15 दिवस 11 तोतया टीटीई ड्युटीवर; आरपीएफने घेतला ताब्यात

Subscribe

रेल्वे स्थानकातून एवढ्या मोठ्या प्रमाणात तोतया टीटीई पकडण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या नवी दिल्ली रेल्वे स्थानकातील सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे

राजधानी दिल्ली हे देशातील महत्त्वाच्या शहरांपैकी एक मानले जाते. यात नवी दिल्ली रेल्वे स्टेशन देखील प्रवासाच्या दृष्टीने तितकेच महत्वाचे आहे. दररोज लाखो प्रवासी या रेल्वे स्थानाकावरून ये जा करत असतात. मात्र या नवी दिल्ली रेल्वे स्थानकात 11 तोतया टीटीईंकडून प्रवाशांची लुटमार झाल्याची असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 11 तोतया टीटीई गेली 15 दिवसांपासून नवी दिल्ली रेल्वे स्थानकात ड्युटी करत होते, ज्याचा कोणालाही थांगपत्ता नाही, धक्कादायक म्हणजे रेल्वे प्रशासनालाही याची माहिती नव्हती, मात्र एका रेल्वे अधिकाऱ्याच्या सतर्कतेमुळे तोतया टीटीईंचा धंदा उघड झाला आहे. या घटनेमुळे आता रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान आरपीएफने संबंधित आरोपींना ताब्यात घेतले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या 15 दिवसांपासून हे 11 तोतया टीटीई दिल्ली रेल्वे स्टेशनवर ड्युटी करत होते. अगदी टीटीईंप्रमाणेच हे पांढरा शर्ट आणि काळी पँट परिधान करून तिकिट तपासणीचे काम करत होते. दरम्यान रेल्वे अधिकाऱ्यांच्या संशयावरून हा प्रकार उघडकीस आला असून तीन आरोपींना अटक केली आहे. दरम्यान आरपीएफ आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी या 11 बनावट तिकिट तपासकांना रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत तीन आरोपींना अटक झाल्याची माहिती रेल्वे डीसीपी हरेंद्र सिंह यांनी दिली आहे. याप्रकरणी इतर आरोपींची चौकशी केली जात आहे.

- Advertisement -

मंगळवारी रेल्वे अधिकारी रितेश वाधवा कानपूर शताब्दी येथून प्रवास करत होते. ट्रेन गाझियाबादला पोहचली तेव्हा त्यांना एक व्यक्ती तिकीट तपासताना दिसली. यावेळी चौकशीत त्यांना संशय आला, त्यानंतर नवी दिल्ली स्थानकातून आरोपीला पकडण्यात आले, गोरखपूर येथील भूपेंद्र चौरसिया असे त्याचे नाव आहे. त्याच्या चौकशीनंतर अशा आणखी 10 तरुणांना ताब्यात घेण्यात आले, यावेळी काहींकडे बनावट नियुक्तीपत्रे आढळली आहेत. रेल्वे स्थानकातून एवढ्या मोठ्या प्रमाणात तोतया टीटीई पकडण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या नवी दिल्ली रेल्वे स्थानकातील सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


जेव्हा विनाश हा तमाशा असल्यासारखा साजरा केला जातो…अतुल कुलकर्णीची पोस्ट चर्चेत


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -