मेहरौलीच्या जंगलात श्रद्धाच्या मृतदेहाचे ११ तुकडे सापडले, तपासकार्यात सीबीआयची एन्ट्री

आतापर्यंत जप्त केलेले सर्व तुकडे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या तपासणीनंतरच हे तुकडे श्रद्धाच्या मृतदेहाचे आहेत की नाही हे समजेल. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आलेली करवतही पोलिसांना सापडलेली नाही.

shraddha

नवी दिल्ली – वसईत राहणाऱ्या श्रद्धा वालकरची (Delhi Murder Case) दिल्लीत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. याप्रकरणी तिचा प्रियकर आफताब अमीन पूनावाला (Aftab Poonawala) याला अटक करण्यात आली असून त्याने ज्या ठिकाणी मृतदेहाचे तुकडे फेकले आहेत तिथे तपास सुरू आहे. मंगळवारी मेहरौली जंगलात केलेल्या तपासात पोलिसांना ११ तुकडे सापडले आहेत. सोमवारी केलेल्या तपासात पोलिसांना १४ तुकडे सापडले होते. (11 pieces of Shraddha’s body found in Mehrauli forest)

हेही वाचा – Inside Story! श्रद्धाला आधीच होता तिच्या हत्येचा संशय; मित्राला सांगितलं असं काही…

दरम्यान, श्रद्धा हत्याकांडात केंद्रीय अन्वेषण विभागानेही एन्ट्री मारली आहे. सीबीआयच्या फॉरेन्सिक टीमनेही पुरावे गोळा केले असून ते पुरावे लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. सीबीआयची ही मदत श्रद्धाच्या मृतदेहाच्या तुकड्यांची पडताळणी करण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे. बुधवारीही तपासाची प्रक्रिया सुरू राहणार असून दिल्ली पोलीस आफताबला पुन्हा मेहरौलीच्या जंगलात घेऊन जाऊ शकतात. दिल्ली पोलिसांना श्रद्धाच्या शरीराचे एकूण 35 तुकडे शोधायचे आहेत, त्यात तिच्या धडाचाही समावेश आहे. त्याचवेळी या हत्याकांडाचा सर्वात महत्त्वाचा पुरावा मानल्या जाणाऱ्या श्रद्धाचे शीर सापडलेले नाही.

हेही वाचा – मुंबईतील तरुणीची दिल्लीत हत्या, 6 महिन्यांनंतर लागला तपास; वाचा नेमके प्रकरण काय?

मंगळवारी श्रद्धाच्या मृतदेहाचे 11 तुकडे सापडले

मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास मेहरौली पोलिस ठाण्याच्या पथकाने आफताबला सोबत घेऊन सुमारे आठ तास तपास करून सुमारे तीन किलोमीटर जंगलात शोध घेतला. शरीराचे अवयव कुठे फेकले गेले यावरून आफताबही गोंधळलेला होता. मात्र, त्याच्या सांगण्यावरून शरीराचे 11 अवयव जप्त करण्यात आले. आतापर्यंत जप्त केलेले सर्व तुकडे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या तपासणीनंतरच हे तुकडे श्रद्धाच्या मृतदेहाचे आहेत की नाही हे समजेल. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आलेली करवतही पोलिसांना सापडलेली नाही.

सीबीआयच्या फॉरेन्सिक टीमनेही पुरावे गोळा केले

सीबीआयच्या फॉरेन्सिक टीमनेही दिल्ली पोलिसांना मदत करण्यासाठी पुरावे गोळा केले. वैज्ञानिक पद्धतीने पुरावे गोळा करण्यात ही टीम माहीर आहे. पोलीस आफताबला घेऊन मेहरौली पोलीस ठाण्यात परतले तेव्हा सीबीआयला सर्व पुराव्याची माहिती मिळाली. दरम्यान, श्रद्धाच्या वडिलांनीही तिच्यावर लव्ह जिहादचा आरोप केला आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे या दृष्टिकोनातूनही तपास केला जात आहे.