घर ताज्या घडामोडी Coronavirus : देशात 24 तासांत 11 हजार 683 कोरोना रुग्णांची नोंद, तर...

Coronavirus : देशात 24 तासांत 11 हजार 683 कोरोना रुग्णांची नोंद, तर 28 रुग्णांचा मृत्यू

Subscribe

मागील काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. देशात 24 तासांत 11 हजार 683 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 3 कोटी 43 लाख 88 हजार 579 वर पोहोचली आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या घटून 1 लाख 39 हजार 683 वर पोहोचली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनामुळं 460 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे देशात कोरोनामुळे एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा 4,61,849 वर पोहोचला आहे.

- Advertisement -

राज्यातील स्थिती काय?

राज्यात आज 982 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1293 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तसेच राज्यात आतापर्यंत 64 लाख 61 हजार 956 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.62 टक्के आहे. तसेच मुंबईसह ठाण्यातही कोरोना रुग्ण सक्रिय असल्याचं निदर्शनास आलं आहे. परंतु कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला थोपवण्यात मुंबई महानगरपालिकेला मोठं यश आलं आहे. तसेच राज्यात 24 तासांत 27 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. त्याचप्रमाणे राज्यात सध्या 13 हजार 311 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

- Advertisement -

दरम्यान, देशात सलग 33 दिवसांपासून कोरोनाच्या 20 हजारांहून कमी सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात येत आहे. तर 136 दिवसांपासून 50 हजार सक्रिय रुग्णांची नोंद केली जात आहे. राष्ट्रीय लसीकरण मोहीमेतंर्गत आतापर्यंत 220.66 कोटी लशीचे डोस देण्यात आले आहेत. मागील 24 तासांत 3,647 कोरोना लशीचे डोस देण्यात आले आहेत.


हेही वाचा : ‘व्हाईट नाईट कॉर्प्स’ शहीदांच्या कुटुंबासोबत; पाच जवानांची नावे


 

- Advertisment -