Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर क्राइम ३० मिनिटं कुत्र्यांनी तोडले ११ वर्षांच्या मुलाचे लचके, शरीरावर १०० हून अधिक...

३० मिनिटं कुत्र्यांनी तोडले ११ वर्षांच्या मुलाचे लचके, शरीरावर १०० हून अधिक ठिकाणी घेतले चावे 

Subscribe

बरेलीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. ११ वर्षांच्या एका अल्पवयीन मुलावर काही कुत्र्यांनी हल्ला करत त्याची निर्घृण हत्या केली. कुत्र्यांनी त्याच्या अंगावर १०० हून अधिक ठिकाणी चावा घेतला. त्यानंतर ५० मीटरपेक्षा अधिक जागेपर्यंत त्याला रस्तावरून ओढत नेले. ही घटना काल उत्तर प्रदेशमधील बरेली या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत अजून एक मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे. ही घटना सीबीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत खना गोटिया गावात घडली. या मुलाची ओळख अयान मोहम्मद इरफान या नावाने आहे. तसेच त्याचं वयवर्ष ११ आहे. घरापासून ४०० मीटर अंतरावर अयान इरफान खेळत होता.

- Advertisement -

अयानसोबत आणखीन ५ मुलं देखील खेळत होती. परंतु याचदरम्यान कुत्र्यांचा एक घोळका त्या मुलांजवळ आला आणि त्या कुत्र्यांनी मुलांना घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या मुलांनी कुत्र्यांना हकलून लावण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना अपयश आलं. कुत्र्यांनी घेराव घातल्यानंतर अयानसह त्याचे मित्र पळत सुटले. मात्र, अयान धावताना खाली पडला आणि कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला.

जवळपास १० पेक्षा अधिक कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला आणि ३० मिनिटांतच त्यांनी अयानच्या शरीराचे लचके तोडले. त्यातच तो गंभीर जखमी झाला आणि दुर्देवीपणे त्याचा मृत्यू झाला. त्याचसोबतच या हल्ल्यात अयानसोबत खेळणाऱ्या ८ वर्षीय अर्सवरही कुत्र्यांनी हल्ला केला. यावेळी तो गंभीर जखमी झाला असून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

२ महिन्यांपूर्वीही बरेलीमध्ये ३ वर्षांच्या मुलीचा झाला होता मृत्यू

२ महिन्यांपूर्वी सीबीगंज पोलीस स्टेशन हद्दीतील बंडिया गावात मोकाट कुत्र्यांनी ३ वर्षांच्या मुलीला ठार केले होते. गावात राहणाऱ्या अवधेश गंगवार यांची मुलगी घराबाहेर खेळत होती. मोकाट कुत्र्यांनी या मुलीला १५० मीटरपर्यंत ओढले होते. आता ही दुसरी घटनाही सीबीगंज परिसरातच घडली आहे. यापूर्वी नागरिकांनी महापालिकेकडे भटक्या कुत्र्यांबाबत तक्रारी केल्या होत्या, मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नव्हती. मात्र, या धक्कादायक घटनेनंतर महापालिका किंवा प्रशासन यावर पुढील कारवाई करणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.


हेही वाचा : Ratnagiri: अल्पवयीन मुलीवर बलात्कार करत खून; आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा


 

- Advertisment -