Homeक्राइमCrime : गृहपाठाच्या भीतीने 11 वर्षाच्या मुलांनी रचली अपहरणाची कथा, पण...; असा...

Crime : गृहपाठाच्या भीतीने 11 वर्षाच्या मुलांनी रचली अपहरणाची कथा, पण…; असा झाला उलगडा

Subscribe

बंगळुरू : चित्रदुर्गाचे पोलीस अधीक्षक रणजीत कुमार बंडारू यांना मुलांचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याचा फोन आला. 11 वर्षांच्या दोन मुलांनी दावा केला की, ते अपहरणाच्या प्रयत्नातून थोडक्यात बचावले आहे. याप्रकरणी पोलीस हायअलर्टवर आले आणि त्यांनी अपहरणकर्त्यांचा शोध घेण्यासाठी पथकं तैनात केली. मात्र कसून तपास केला दोन विद्यार्थ्यांनी गृहपाठ न करण्याच्या भीतीने अपहरणाची कथा रचल्याचे समोर आले. (11-year-old boys in Bengaluru fabricate kidnapping story due to fear of homework)

मिळालेल्या माहितीनुसार, 11 वर्षांची दोन्ही मुले इमंगळाजवळील अब्बिनाहोल गावात राहतात. ती रोज सकाळी धर्मपुरासाठी 6.30 ची बस पकडायचे आणि 9.30 वाजता शाळेत जाण्यापूर्वी ते दोघे एका खासगी शिकवणीसाठी जात होते. मात्र आज सकाळी 10 वाजता दोन्ही मुले शाळेच्या दप्तरंशिवाय घरी परतली तेव्हा त्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी मुलांची चौकशी करताना अपहरणकर्त्यांनी त्यांना एवढ्या लवकर का सोडले? असा प्रश्न विचारला. यावर त्या दोघांनी घडलेला सर्व प्रकार सांगितला.

विद्यार्थ्यांनी म्हटले की, एका गाडीतून तीन मुखवटा घातलेल्या जणांनी त्यांचे अपहरण केले. आमच्या चेहऱ्यावर एका पदार्थाचा मारा केला, यानंतर आम्ही बेशुद्ध झालो. जेव्हा आम्ही शुद्धीवर आलो, तेव्हा अपहरणकर्ते हिंदीत म्हणत होते की, ‘ये वो बच्चे नहीं हैं’ आणि त्यांनी आम्हाला रस्त्याच्या कडेला सोडून दिले. मुलांचे वागणे आणि त्या दोघांची शाळेची बॅग हरवल्यामुळे दोघांचे खरंच अपहरण झाल्याचे पोलिसांनी सुरुवातीला वाटले. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक नागरिकांची चौकशी केली. पण अपहरणासंदर्भात पोलिसांना काहीच माहिती मिळत नव्हती. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही मुलांवर संशय आला.

हेही वाचा – Crime : अल्पवयीन मेव्हणीचे वहिनीवर प्रेम, लग्न करायचे होते, पण…; महिलेच्या कुटुंबीयांवर विष दिल्याचा आरोप

रणजीत कुमार बंडारू यांनी शाळेतील शिक्षकांकडे दोन्ही विद्यार्थ्यांबाबत चौकशी केली. यावेळी शिक्षकांनी सांगितले की, दोन्ही मुले खोडकर आहेत आणि ते कधीही त्यांचा गृहपाठ पूर्ण करत नाहीत. मात्र तोपर्यंत वेगवेगळ्या टीमचे अधिकारी अपहरणकर्त्यांचा शोध घेण्यासाठी तैनात करण्यात आले होते. तसेच नागरिकांनीही अपहरणकर्त्यांची गाडी कुठेच दिसली नसल्याचे सांगितले. त्यामुळे दोन्ही विद्यार्थ्यी खोटे बोलत असल्याचा संशय आणखी बळावला. त्यामुळे अपहरणकर्त्यांनी विद्यार्थ्यांनी परत ज्याठिकाणी सोडले, तिथले सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी तपासले. मात्र त्यातही काहीच दिसत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही विद्यार्थ्यांची स्वतंत्र चौकशी करण्याचा निर्णय घेतला.

असा झाला खोट्या अपहरणाचा उलगडा

दरम्यान, शाळेतील शिक्षकांच्या मदतीने पोलिसांनी दोन्ही विद्यार्थ्यांसोबत स्वतंत्र संवाद साधला. यावेळी दोन्ही विद्यार्थ्यांनी सांगितलेल्या कथेत विरोधाभास होता. त्यामुळे त्यांना आश्वासन देण्यात आले की, तुम्ही सत्य सांगितल्यास तुम्हाला कोणतीही शिक्षा होणार नाही. त्यानंतर दोन्ही विद्यार्थ्यांनी अपहरणाची कथा खोटी असल्याची कबुली दिली. याचे कारण त्यांनी गृहपाठ पूर्ण करण्यात मागे पडल्याचे कारण दिले. ज्यासाठी त्यांना शिक्षा होत होती.

हेही वाचा – Crime : बंगळुरूमध्ये आणखी एका आयटी अभियंत्याचा मृत्यू; आत्महत्या करण्यापूर्वी पती-पत्नीने मुलांना दिले विष