११ वर्षीय दीपाची ऑलिम्पियाडसाठी निवड, मोदींना देणार योगाचे धडे

अवघी ११ वर्षीय दीपा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना योग धडे देणार आहे. ही उत्तराखंडची मुलगी असून ती ट्रेनर कांचन रावत यांच्यासोबत योग करणार आहे.

deepa giri and narendra modi

येत्या दोन दिवसांत जागतिक योग दिन साजरा करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) या दिवशी दरवर्षीप्रमाणे योग करणार आहेत. या वेळी ११ वर्षीय दीपाची (Deepa Giri) निवड करण्यात आली आहे. म्हणजे, अवघी ११ वर्षीय दीपा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना योग धडे (Yoga Lesson) देणार आहे. ही उत्तराखंडची मुलगी असून ती ट्रेनर कांचन रावत यांच्यासोबत योग करणार आहे. (11 year old Deepa selected for Olympiad, will give yoga lessons to Modi)

हेही वाचा – योगा दिनानिमित्त देशात रेकॉर्ड ब्रेक लसीकरण, एका दिवसात ७० लाख नागरिकांना दिले लसीचे डोस

दीपा गिरी हिची अंडर १४ राष्ट्रीय योग ऑलिम्पियाडसाठी निवड करण्यात आली आहे. दीपाचे वडिल हे नैनिताल येथील महाधिवक्ता कार्यालयात माळी काम म्हणून करतात. योग दिनानिमित्त २१ जून रोजी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या राष्ट्रीय ऑलिम्पियाडसाठी दीपाची निवड करण्यात आली. दीपाने जीजीआयसी धौलाखेड हल्दवानी येथे एनसीईआरटीद्वारे आयोजित राज्यस्तरीय योग ऑलिम्पियाडमध्ये भाग घेतला आणि उत्कृष्ट कामगिरीमुळे राष्ट्रीय योग ऑलिम्पियाडमध्ये स्थान मिळवले.

दीपा गिरी ही अवघ्या ११ वर्षांची मुलगी असून ती तल्लीतालच्या कृष्णपूर भागात राहते. अटल उत्कृष्ट शासकीय मुलांच्या आंतर विद्यालयात ती इयत्ता सहावीत शिकत आहे. वयाच्या नवव्या वर्षांपासून ती योगा करत असल्याचं सांगण्यात येतंय.