घरक्राइमपाचवीतील मुलानं वडिलांचं अकाऊंट केलं हॅक, मागितली १० कोटींची खंडणी

पाचवीतील मुलानं वडिलांचं अकाऊंट केलं हॅक, मागितली १० कोटींची खंडणी

Subscribe

१० कोटींची खंडणी नाही दिली तर अश्लील फोटो व्हायरल करेन अशीही धमकीही देण्यात आली असल्याचे वडिलांनी सांगतिले.

सध्याच्या डिजिटल युगात हॅकिंगचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. लहान मुलांमध्येही सोशल मीडियाबद्दल खूप आकर्षण आहे. पाचवीत शिकत असलेल्या ११ वर्षाच्या मुलाने आपल्या वडिलांनाच ईमेल करुन १० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. १० कोटी नाही दिले तर अश्लील फोटो व्हायरल करेन अशी धमकीही देण्यात आली. युट्यूबवरुन हॅकिंग शिकून मुलाने वडिलांकडूनच खंडणीची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशमधून समोर आला आहे. धमकीचा मेल वाचून वडिलांनी तातडीने पोलिसात या घटनेची तक्रार केली. हा मेल कोणी पाठवला, कुठून पाठविला याचा शोध पोलिसांना लावला. शोध घेताना पोलिसांना सापडलेला आयपी एड्रेस त्यांच्या घरातील असल्याचे कळले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकारचा खोलवर तपास करायला सुरुवात केली.

वडिलांना आलेला खंडणीचा ईमेल एका हॅकर्स ग्रुपकडून पाठवला असल्याचे ईमेलमध्ये म्हटले होते. वडिलांचा ईमेल हॅक केला. ईमेल हँक केल्यानंतर त्यांचा पासवर्डही बदलला होता. १० कोटींची खंडणी नाही दिली तर अश्लील फोटो व्हायरल करेन अशीही धमकीही देण्यात आली असल्याचे वडिलांनी सांगतिले. वडिलांच्या तक्रारी नंतर पोलिसांनी या प्रकरणाचा शोध घ्यायला सुरुवात केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सायबर सेलकडे सोपविण्यात आला. पोलिसांनी ईमेल कुठून आला हे शोधण्याला सुरुवात केली असता ईमेलचा आयपी एड्रेस हा घरातच सापडला. घरातीलच आयपीएड्रेसवरुन हा प्रकार झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांना चौकशीदरम्यान घरातील मुलाचा संशय आला. पोलिसांनी मुलाची चौकशी केली त्यात मुलाने मीच हा ईमेल वडिलांना पाठविला असल्याचे कबूल केले.

- Advertisement -

पोलिसांनी मुलाच्या केलेल्या चौकशीतून समोर आले की, मुलगा ज्या ठिकाणी कॅम्प्युटर क्लासला जात होता तिथे हॅकिंग विषयी माहिती दिली होती, असे मुलाने सांगितले. हॅकिंगपासून कसे वाचायचे याविषयी क्लासमध्ये शिकवण्यात आले होते. मला त्याबद्दल उत्सुकता वाटली आणि म्हणून मी यूट्यूबर जाऊन हॅकिंग कसे करतात हे शिकलो, असे मुलाने सांगितले. मुलाने आधी युट्यूबवरुन हॅकिंग विषयी सर्व माहिती काढली, हॅकिंग कसे करायचे हे शिकला त्यानंतर त्याने त्याचा पहिला प्रयोग आपल्या वडिलांवरच करायचे ठरवले. मुलाने वडिलांचा ईमेल हॅक करुन त्यांना ईमेल पाठवला आणि १० कोटींच्या खंडणीची मागणी करुन अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकीही देण्यात आली. मात्र मुलाचा हा प्लॉन फसला आणि तो सायबर सेलच्या हाती लागला, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.


हेही वाचा – बायको पळून गेली म्हणून ठेवायचा इतर महिलांशी संबंध आणि नंतर…

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -