Thursday, April 15, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी केरळ प्रवासी ट्रेनमधून स्फोटकांचा साठा जप्त, १०० जिलेटीन कांड्या, ३५० डिटोनेटर ताब्यात

केरळ प्रवासी ट्रेनमधून स्फोटकांचा साठा जप्त, १०० जिलेटीन कांड्या, ३५० डिटोनेटर ताब्यात

Related Story

- Advertisement -

केरळमधील प्रवासी ट्रेनमध्येही मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा आढळल्याने एकचं खळबळ उडाली आहे. कोझिकोड रेल्वे स्थानकावर चैन्नई- मंगळूर एक्सप्रेसमध्ये १०० हून अधिक जिलेटिनच्या काड्या आणि ३५० डिटोनेटर सापडली असल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी एका महिलेला रेल्वे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या महिलेकडून हा सर्व साठा जप्त करण्यात आला आहे. कोझिकोड स्टेशनवर चेन्नई-मंगळुरू एक्सप्रेस (02685) या ट्रेनमध्ये रमानी या महिलेकडून ही स्फोटक ताब्यात घेण्यात आली. या महिलेने एक्सप्रेसमध्ये सीटखाली ही स्फोटके ठेवली होती. याच सीटच्या खालून पोलिसांनी ही स्फोटकं जप्त केली आहेत. या संशयित आरोपी महिलेला रेल्वे पोलीसांनी अटक केली असून तिची कसून चौकशी सुरु आहे. या चौकशी दरम्यान महिलेने विहीर खोदण्य़ाच्या उद्देशाने जिलेटिनच्या कांड्या आणल्या असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी आता रेल्वे पोलीस सध्या अधिक चौकशी करत आहेत.

दरम्यान कालच देशातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानकाजवळ एका स्कॉर्पिओमध्ये २० ते २५ जिलेटिनच्या काड्या आढळल्याने मुंबईत खळबळ उडाली आहे. त्यामुळे हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. या गाडीमध्ये जिलेटिनचा साठा सापडल्यानंतर मुंबई पोलीस, फॉरेन्सिक टीम, आणि श्वानपथकं घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे. या स्फोटकांसह एक चिठ्ठीही सापडली असून त्यामधून घातपाताची धमकी दिल्याचे समोर आले आहे. पोलीस आणि तपास यंत्रणांकडून सीसीटीव्ही फूटेज तपासण्याचं काम सुरु आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, या पत्रात असे लिहिले आहे की, “नीता भाभी आणि मुकेश भैय्या कुटुंबीय, ही तर एक झलक आहे. पुढच्या वेळी हे सामान पूर्ण येईल आणि संपूर्ण कुटुंबाला उडवून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, काळजी घ्या.” वृत्तसंस्थेने पोलीस सुत्रांच्या हवाल्याने असे सांगितले की, कार पार्क करणाऱ्या एका व्यक्तीने साधारण एक महिन्यासाठी त्या परिसराची रेकी केली होती.


हेही वाचा- मुकेश अंबानी यांच्या बंगल्याजवळ सापडलेल्या स्फोटकाप्रकरणी FIR दाखल

- Advertisement -

 

- Advertisement -