घरताज्या घडामोडीदरमहिन्याला ११वी,१२वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ५-७ हजार रुपये, जाणून घ्या योजना

दरमहिन्याला ११वी,१२वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ५-७ हजार रुपये, जाणून घ्या योजना

Subscribe

देशाचे पुढील भविष्य आणि विद्यार्थ्यांचे भविष्य सुधारण्यासाठी, देशातील विज्ञान क्षेत्रात दडलेल्या प्रतिभा पुढे आणण्याच्या उद्दिष्टाने सुरू केली 'ही' योजना

भारत सरकारकडून शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठ स्तरावर विज्ञान संबंधित विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. या योजनेच्या अंतर्गत ११वी, १२वी आणि पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. ही योजना भारतीय विज्ञान संस्था बंगळुरू चालवत असून ‘किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना’ असं या योजनेचं नाव आहे. याअंतर्गत विज्ञान, तंत्रज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.

गेल्या दोन दशकांपासून विज्ञान क्षेत्रात करिअर करण्यासाठी ‘किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना’ विद्यार्थ्यांना मदत करत आहे. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना दरमहिना ५ हजार आणि ७ हजार रुपये दो वेगवेगळ्या शिष्यवृत्या दिल्या जातात. यासाठी विद्यार्थ्यांनी एक अर्ज करणे आवश्यक असते.

- Advertisement -

१९९९ साली विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने या योजनेची सुरुवात केली. देशाचे पुढील भविष्य आणि विद्यार्थ्यांचे भविष्य सुधारण्यासाठी, देशातील विज्ञान क्षेत्रात दडलेल्या प्रतिभा पुढे आणणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. उच्चस्तरीय प्रवेश परीक्षा घेऊन राष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थ्यांची निवड केली जाते. या परीक्षा सहसा दोन टप्प्यात होतात. पहिल्या टप्प्यात ऑनलाईन Aptitude टेस्ट आणि दुसऱ्या टप्प्यात मुलाखत होते.

योजनेचा लाभ घेण्यासाठी काय असावी पात्रता?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना १०वीमध्ये विज्ञान आणि गणित विषयात ७५ टक्के गुण मिळणे गरजेचे आहे. याशिवाय अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागास प्रवर्गासाठी १० टक्के सूट दिली जाते. तसेच प्रथम वर्षातील पदवीधर विद्यार्थ्यांना १२वीमध्ये ६० टक्के मिळणे गरजेचे आहे. तर अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागास प्रवर्गासाठी १० टक्के सूट असल्यामुळे ५० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे.

- Advertisement -

योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘या’ लिंकवर क्लिक करा

http://kvpy.iisc.ernet.in/main/fellowship.htm


हेही वाचा – दहावी, बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -