घरदेश-विदेशदक्षिण आफ्रिकेच्या 12 चित्त्यांचा गट 18 फेब्रुवारीला पोहोचणार भारतात; वाचा त्यांचा संपूर्ण प्रवास

दक्षिण आफ्रिकेच्या 12 चित्त्यांचा गट 18 फेब्रुवारीला पोहोचणार भारतात; वाचा त्यांचा संपूर्ण प्रवास

Subscribe

साऊथ आफ्रिकेतील चित्ते भारतात एक आकर्षणाचा विषय ठरत आहेत. गेल्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त साऊथ आफ्रिकेच्या नामिबियातील आठ चित्त्यांची जोडी मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यातील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आली. यानंतर आता 12 चित्त्यांचा दुसरा गट (7 नर आणि 5 मादी) दक्षिण आफ्रिकेतून 18 फेब्रुवारी रोजी भारतात दाखल होणार आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी गुरुवारी ही माहिती दिली आहे. हे सर्व चित्ते मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्क (KNP)मध्येच आणले जाणार आहेत.

यापूर्वी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारतातील चित्तांचे पुनर्वसन करण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून नामिबियातील आठ चित्ते केएनपीमध्ये आणण्यात आले होते. यावर वन्यजीव महासंचालक (डीजी) एसपी यादव म्हणाले की, कुनो नॅशनल पार्कमध्ये आणलेल्या सर्व चित्त्यांनी त्यांच्या वातावरणाशी चांगले जुळवून घेतले आहे. यातील ‘सासा’ नावाचा चित्ता वगळता सर्व चित्त्याचं आरोग्य निरोगी आहे.

- Advertisement -

असा असेल या चित्त्यांचा प्रवास

दक्षिण आफ्रिकेतील 12 चित्त्यांना देशात आणण्यासाठी भारतीय वायुसेनेच्या C-17 ग्लोबमास्टर विमानाने आज सकाळी हिंडन एअरबेसवरून दक्षिण आफ्रिकेला उड्डाण केले. भारतीय हवाई दल या कामासाठी कोणतेही पैसे घेत नाही. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते 18 फेब्रुवारीला कुनो नॅशनल पार्कमध्ये हे 12 दक्षिण आफ्रिकेतील चित्ता सोडण्यात येणार आहेत.

शुक्रवारी संध्याकाळी भारतीय वायुसेनेच्या विमानाने सात नर आणि पाच मादी चित्ते दक्षिण आफ्रिकेपासून हजारो मैलांचा प्रवास करत भारतातील त्यांच्या नवीन घराकडे प्रवास सुरू करतील, हे चित्ते शनिवारी सकाळी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर हवाई दलाच्या तळावर पोहोचतील आणि 30 मिनिटांनंतर त्यांना भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टरद्वारे सुमारे 165 किमी अंतरावरील श्योपूर जिल्ह्यातील केएनपी पार्कमध्ये नेले जाईल.

- Advertisement -

दुपारी 12 वाजता केएनपी येथे उतरल्यानंतर अर्ध्या तासानंतर त्यांना क्वारंटाईनमध्ये (संलग्न) ठेवण्यात येईल. केएनपीचे संचालक उत्तम शर्मा म्हणाले की, त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील चित्तांसाठी 10 एन्क्लोजर तयार केले आहेत. यातील दोन एन्क्लोजरमध्ये चित्ता दोन जोड्या ठेवण्यात येणार आहेत.

तज्ञांनी सांगितले की, दक्षिण आफ्रिकेतील एका शिष्टमंडळाने गेल्या वर्षी सप्टेंबरच्या सुरुवातीला KNP ला भेट दिली, यावेळी त्यांनी जगात सर्वात वेगाने धावणाऱ्या या चित्त्यांच्या राहण्यासाठीच्या वन्यजीव अभयारण्याचा आढावा घेतला. या चित्त्यांच्या हस्तांतरणासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गेल्या महिन्यात करार झाला होता. दक्षिण आफ्रिकेने हे चित्ते भारताला दान केले आहेत. मात्र या प्रत्येक चित्ताला आणण्यापूर्वी भारताला 3000 अमेरिकन डॉलर द्यावे लागतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर रोजी त्यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त नामिबियातून KNP मध्ये 8 चित्ते सोडले होते, परंतु त्यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या सरकारकडून मान्यता न मिळाल्यामुळे या 12 चित्त्यांचा गट KNP मध्ये दाखल होऊ शकला नाही. भारतीय वन्यजीव कायद्यांनुसार, प्राणी आयात करण्यापूर्वी त्यांना एक महिन्यासाठी वेगळं ठेवणं अनिवार्य आहे, त्यांना भारतात आल्यानंतर पुढील 30 दिवस वेगळे ठेवणे आवश्यक आहे. माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी 2009 मध्ये संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या अंतर्गत चित्त्यांची भारतात पुन्हा ओळख करून देण्याच्या उद्देशाने ‘प्रोजेक्ट चीता’ सुरू केला होता.


अमित शाहांच्या कोल्हापुर दौऱ्यावर राजू शेट्टींची खोचक टीका, म्हणाले, आमच्याकडे तणनाशक…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -