घरदेश-विदेशपूर्वा एक्स्प्रेसचे १२ डबे रुळावरुन घसरले; १०० प्रवासी जखमी

पूर्वा एक्स्प्रेसचे १२ डबे रुळावरुन घसरले; १०० प्रवासी जखमी

Subscribe

मध्यरात्री जवळपास १ च्या सुमारास रेल्वे रुळावरुन घसरली. कानपूर आणि रुमा रेल्वे स्टेनश दरम्यान ही घटना घडली. या अपघातामध्ये १०० रेल्वे प्रवासी जखमी झाले आहे.

उत्तरप्रदेशच्या कानपूरजवळ मध्यरात्री मोठा रेल्वे अपघात झाला. पूर्वा एक्स्प्रेसचे १२ डबे स्फोट होऊन रुळावरुन खाली घसरले. पूर्वा एक्स्प्रेस हावडावरुन दिल्लीला जात असताना ही घटना घडली आहे. मध्यरात्री जवळपास १ च्या सुमारास रेल्वे रुळावरुन घसरली. कानपूर आणि रुमा रेल्वे स्टेनश दरम्यान ही घटना घडली. या अपघातामध्ये १०० रेल्वे प्रवासी जखमी झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन,पोलीस प्रशासन आणि एनडीआरएफची टीमने घटनास्थळी धाव घेत बचावकार्याला सुरुवात केली आहे. या रेल्वे अपघातानंतर अप आणि डाऊन मार्गावर जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.

- Advertisement -

कानपूरपासून जवळपास १५ किलोमीटर दूरवर असलेल्या रुमा गावाजवळ हा अपघात घडला आहे. प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री १ वाजता ही घटना घडली. एक स्फोट होऊन ट्रेनचे दोन भाग झाले. यावेळी मोठा झटका बसला. मध्यरात्र होती त्यामुळे सर्व प्रवासी झोपेत होते. एक्स्प्रेसचे १२ डबे रुळावरुन घसरले. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार एस ८, एस ९, बी १, बी ५, ए १, ए २,एचए १, पॅन्ट्री कार आणि एक एसएलआर डबा रुळावरुन घसरले आहेत. या अपघातामध्ये १०० पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना काशीराम ट्रामा सेंटर आणि हैलट हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. किरकोळ जखमी झालेल्यांवर उपचार करुन त्यांना सोडण्यात आले आहेत.

- Advertisement -

घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी, एसएसपी, ३० अँब्युलन्स, फायर ब्रिगेड, पोलीस प्रशासन, रेल्वे प्रशासन आणि एनडीआरएफच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य युध्द पातळीवर करत सर्व जखमींना काशीराम ट्रामा सेंटर आणि हॅलट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत 00कोणतीही जीवितहानी झालेली नाही. जखमींवर उपचार सुरु आहेत. या अपघातामुळे या मार्गावरील अप आणि डाऊनची रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. कानपूरची हमसफर एक्स्प्रेस, शिवगंगा एक्स्प्रेससह तीन एक्स्प्रेस खोळंबल्या आहेत. तसंच इलाहाबादमधअये जवळपास ३२ ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.

रेल्वे रुळाचे मोठे नुकसान झाले आहे. पूर्वा एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन हटवण्याचे काम सुरु आहे. दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर सुरु असून लवकरच वाहतूनक पूर्वपदावर आणण्यात येईल असे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे. दरम्यान, या घटना प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. अपघातात जखमी झालेल्यांची माहिती जाणून घेण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आले आहेत.

मिर्जापूर – 05442220095
इलाहाबाद (प्रयागराज) – 0532 1072
फतेहपूर – 05180-1072, 05280222025, रेलवे 222436
कानपूर- 0512-1072, 05122323015, 2323016, 2323018
टूंडला – 05612220337, 220338
इटावा – 05688266382, 05688266383
अलीगढ़ – 05712403458

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -