घरताज्या घडामोडीधक्कादायक! मोरबी पूल दुर्घटनेत भाजपा खासदार मोहन कुंदारियांच्या कुटुंबातील 12 जणांचा मृत्यू

धक्कादायक! मोरबी पूल दुर्घटनेत भाजपा खासदार मोहन कुंदारियांच्या कुटुंबातील 12 जणांचा मृत्यू

Subscribe

गुजरातच्या मोरबीमध्ये मच्छू नदीवरील पूल कोसळून 143 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. रविवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना असून, अजूनही बचावकार्य घटनास्थळी सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मृतांमध्ये भाजपा खासदार मोहन कंदारिया यांच्या कुटुंबातील 12 जणांचा समावेश आहे.

गुजरातच्या मोरबीमध्ये मच्छू नदीवरील पूल कोसळून 143 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. रविवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना असून, अजूनही बचावकार्य घटनास्थळी सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मृतांमध्ये भाजपा खासदार मोहन कंदारिया यांच्या कुटुंबातील 12 जणांचा समावेश आहे. याबाबत स्वत: मोहन कुंदारिया यांनी माहिती दिली. (12 members of Rajkot BJP MP Mohan Kalyanji Kundariya family killed in Morbi bridge collapse)

मोहन कुंदारिया हे भाजपाचे राजकोटमधील खासदार आहेत. या मोरबी पूल कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर भाजपा खासदार मोहन कुंदारिया यांनी ‘इंडिया टुडे’ या वृत्तवाहिनीशी बातचित करताना याबाबत माहिती दिली. “या दुर्घटनेत मी 5 मुलांसह माझ्या कुटुंबातील 12 सदस्य गमावले आहेत. तसेच, मी माझ्या बहिणीच्या कुटुंबातील सदस्य गमावले आहेत”, असे कुंदारिया यांनी सांगितले.

- Advertisement -

याशिवाय, “एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि स्थानिक प्रशासन शर्तीच्या प्रयत्नांनी शोध आणि बचावकार्य करत आहेत. दुर्घटनेतून वाचलेल्या सर्वांची सुटका करण्यात आली आहे. मच्छू नदीतील मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि बचाव नौकाही घटनास्थळी आहेत”, असे त्यांनी म्हटले.

बचाव कार्यादरम्यान नागरिकांचे मृतदेह आढळून येत आहेत. यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. जवळपास 12 तास उलटुन गेले तरी, बचावकार्य सुरू आहे. सद्यस्थितीत मृतांच्या शोधासाठी ड्रोनचा वापर केला जात असल्याची माहिती समोर येत आहे.

- Advertisement -

चौकशीसाठी एसआयटी स्थापन

  • मोरबीच्या दुर्घटनेच्या चौकशीसाठी सरकारने विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे.
  • या पाच सदस्यीय टीममध्ये आर अँड बी सचिव संदीप वसावा, आयएएस राजकुमार बेनिवाल, आयपीएस सुभाष त्रिवेदी,
    मुख्य अभियंता केएम पटेल यांच्यासह डॉ. गोपाल टांक यांचा समावेश आहे.
  • हे विशेष तपास पथक अपघाताचे कारण शोधणार आहे.

हेही वाचा – मोरबी दुर्घटनेत 143 जणांचा मृत्यू; पंतप्रधानांचे सर्व कार्यक्रम रद्द, चौकशीसाठी एसआयटी स्थापन

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -