घरताज्या घडामोडीगुजरातमध्ये कारखान्याची भिंत कोसळून 12 कामगारांचा मृत्यू; पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

गुजरातमध्ये कारखान्याची भिंत कोसळून 12 कामगारांचा मृत्यू; पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

Subscribe

गुजरातच्या मोर्बी जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. मोर्बी जिल्ह्यात एका मिठाच्या फॅक्ट्रीतील भिंत कोसळल्याने 12 जाणांचा मृत्यू झाल्याचे समजते.

गुजरातच्या मोर्बी जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. मोर्बी जिल्ह्यात एका मिठाच्या कारखान्यातील भिंत कोसळल्याने 12 जाणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत बचावकार्याला सुरूवात केली. तसंच, आणखी काहीजण अडकल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील मोरबी येथील हलवड जीआयडीसी येथे मिठाच्या कारखान्यामध्ये कामगार काम करत होते. त्याचवेळी या कारखान्यातील भिंत कोसळली. कोसळलेल्या भिंतीच्या मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून 12 कामगारांचा मृत्यू झाला. दरम्यान, या दुर्घटनेनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. तसंच, प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना ‘पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी’मधून प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींना ५०-५० हजार रुपये दिले जाणार आहेत.

- Advertisement -

राज्याचे कामगार आणि रोजगार मंत्री आणि स्थानिक आमदार ब्रिजेश मेरजा यांनीही या दुर्घटनेची दखल घेतली आहे. “हलवड औद्योगिक परिसरात असलेल्या समुद्री मीठ कारखान्यात ही दुःखद घटना घडली. फॅक्ट्रीतील 12 कामगारांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या इतरांना वाचवण्याचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत”, असे त्यांनी म्हटले.

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक कामगाराच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ४ लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी मोरबीचे जिल्हाधिकारी आणि यंत्रणा चालकांना तात्काळ बचाव आणि मदत कार्य करण्याचे निर्देश दिले.

- Advertisement -


हेही वाचा – ज्ञानवापी प्रकरण : शिवलिंगवर कमेंट करणे पडले महागात; एमआयएम पक्षाच्या प्रवक्त्याला अटक

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -