घरताज्या घडामोडीCorona virus : इटलीहून अमृतसरमध्ये दाखल चार्टर्ड फ्लाईटमध्ये कोरोनाचा विस्फोट, १२५ प्रवासी...

Corona virus : इटलीहून अमृतसरमध्ये दाखल चार्टर्ड फ्लाईटमध्ये कोरोनाचा विस्फोट, १२५ प्रवासी पॉझिटिव्ह

Subscribe

इटलीतून पंजाबमधील अमृतसरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या चार्टर्ड फ्लाईटमध्ये १२५ प्रवाशांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या फ्लाईटमधून १७९ लोकं प्रवास करत होते. परंतु प्रवाशांची चाचणी केली असता काहींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह आलेल्या प्रवाशांना अमृतसरमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं आहे. एएनआय वृत्तसंस्थेने अमृतसरचे एअरपोर्ट डायरेक्टर वीके सेठ यांच्याकडून ही माहिती देण्यात आली आहे.

पहिल्यांदा ही फ्लाईट एअर इंडियांची असल्याचं सांगितलं जात होतं. परंतु रोममधून एअर इंडियाची कोणतीही फ्लाईट भारतात येत नसल्याची माहिती एअर इंडियाने स्वत: दिली आहे. देशात कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. मागील २४ तासांत देशात कोरोनाचे ९० हजार ९२८ रूग्ण आढळून आले आहेत. तर ३२५ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. बुधवारच्या तुलनेत आज गुरुवारी कोरोनाची टक्केवारी ५६.५ टक्के अधिक आहे.

- Advertisement -

पाच राज्यांमध्ये आढळले सर्वाधिक रूग्ण

कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असून देशातील पाच राज्यांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे २६ हजार ५३८ इतके रूग्ण आढळून आले आहेत. तर पश्चिम बंगालमध्ये १४ हजार २२ रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच दिल्लीमध्ये १० हजार ६५५ रूग्ण, तामिळनाडू ४ हजार ८६२ रूग्ण आणि केरळमध्ये ४ हजार ८०१ इतक्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रात २९.१९ टक्के केस आढळले असून देशातील एकूण पाच राज्यांमध्ये ६६ टक्के केसेस आढळून आल्या आहेत.

देशात ओमिक्रॉनचे २ हजार ६३० रूग्ण

संपूर्ण जगभरासह देशात ओमिक्रॉनच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. देशात ओमिक्रॉनचे २ हजार ६३० इतके रूग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये ओमिक्रॉनचे सर्वाधिक म्हणजे ७९७ आणि ४६५ इतके रूग्ण आढळले आहेत. तसेच २ हजार ६३० रूग्णांमधून ९९५ रूग्णांनी ओमिक्रॉनवर मात केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : रश्मी ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह ट्विट करणारा भाजपचा गजारिया पोलिसांच्या ताब्यात


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -