घरताज्या घडामोडीधक्कादायक! तामिळनाडूत दोन आठवड्यात ५ विद्यार्थीनींचे सापडले मृतदेह; स्थानिकांत संताप

धक्कादायक! तामिळनाडूत दोन आठवड्यात ५ विद्यार्थीनींचे सापडले मृतदेह; स्थानिकांत संताप

Subscribe

तामिळनाडूत गेल्या अनेक दिवसांपासून १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या मृत्यू झाल्याची प्रकरणे समोर येत आहेत. त्यानुसार, मंगळवारी सकाळी कुड्डालोरमध्ये आणि त्याच दिवशी संध्याकाळी शिवकाशी जिल्ह्यात ११ वीत शिकणारी विद्यार्थिनी घरी मृतावस्थेत आढळली.

तामिळनाडू १२ वीच्या आणखी एका विद्यार्थिनीचा मृतदेह सापडला आहे. ही घटना शिवगंगा जिल्ह्यातील कराईकुडी येथे घडल्याचे समजते. विद्यार्थ्याच्या मृतदेहाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, याप्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरूवात केली आहे. (12th standard five students dead in 2 weeks in tamilnadu)

तामिळनाडूत गेल्या अनेक दिवसांपासून १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या मृत्यू झाल्याची प्रकरणे समोर येत आहेत. त्यानुसार, मंगळवारी सकाळी कुड्डालोरमध्ये आणि त्याच दिवशी संध्याकाळी शिवकाशी जिल्ह्यात ११ वीत शिकणारी विद्यार्थिनी घरी मृतावस्थेत आढळली. तसेच, सोमवारी सकाळी तिरुवल्लूर जिल्ह्यातील सेक्रेड हार्ट गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूलच्या वसतिगृहाच्या खोलीतून १२वीची विद्यार्थिनी मृतावस्थेत आढळली.

- Advertisement -

कराईकुडीच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवगंगा जिल्ह्यातील कराईकुडीजवळ १२ वीच्या विद्यार्थिनीने तिच्या घरात गळफास लावून घेतला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, त्या विद्यार्थिनीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन पूर्ण झाले आहे. मृतदेह त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आला. या महिन्यातील अशा प्रकारची ही पाचवी घटना आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन आठवड्यात १२ वीच्या ४ विद्यार्थ्यांचा आणि ११ वीच्या एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, सतत घडणाऱ्या या घटनांमुळे राज्यातील पोलिस, प्रशासन आणि सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याप्रकरणी पोलीस अधिकारी स्पष्टपणे काहीही बोलण्यास टाळाटाळ करत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – अडीच वर्षे ज्या आमदारांमुळे मंत्रीपद भूषवले, त्यांच्याबद्दल चुकीचा उल्लेख संस्कृतीला धरून नाही – केसरकर

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -