घर देश-विदेश 'इंडिया' समन्वय समितीत 28पैकी 14 पक्षांचा समावेश; शरद पवार आणि संजय राऊत...

‘इंडिया’ समन्वय समितीत 28पैकी 14 पक्षांचा समावेश; शरद पवार आणि संजय राऊत यांची निवड

Subscribe

मुंबई : विरोधकांची आघाडी असलेल्या ‘इंडिया’ची दोन दिवसीय बैठक मुंबईतली ग्रॅण्ड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये कालपासून (गुरुवार) सुरू आहे. या बैठकीत इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. यात 28पैकी 14 पक्षांचा यात समावेश आहे. या समितीसाठी महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांचा निवड करण्यात आली आहे.

- Advertisement -

सत्ताधारी भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी विरोधक पुन्हा एकवटले आहेत. देशात हुकूमशाही येत असल्याचा आरोप करत विरोधकांनी येत्या लोकसभा निवडणुकीसाठी एकजूट दाखविली आहे. 23 जून 2023 रोजी विरोधकांची पहिली बैठक बिहारमधील पाटणा येथे झाली. त्या बैठकीला 15 विरोधी पक्ष उपस्थित होते. त्यानंतर दुसरी बैठक 18 जुलै 2023 रोजी बंगळुरूमध्ये झाली. या बैठकीत 26 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली. या बैठकीत विरोधकांच्या आघाडीचे ‘इंडिया’ असे नामकरण करण्यात आले. आता मुंबईत या आघाडीची तिसरी बैठक झाली. ग्रॅण्ड हयात या पंचतारांकित ह़ॉटेलमधील बैठकीत आघाडीच्या समन्वय समितीची घोषणा करण्यात आली.

हेही वाचा – One Nation, One Election : …अशा अफवा पसरवण्याची गरज काय? पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल

- Advertisement -

के. सी. वेणुगोपाल (काँग्रेस), शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेस), टी. आर. बालू (द्रमुक), संजय राऊत (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), तेजस्वी यादव (राष्ट्रीय जनता दल), अभिषेक बॅनर्जी (तृणमूल काँग्रेस), राघव चढ्ढा (आम आदमी पार्टी), जावेद अली खान (समाजवादी पार्टी), लल्लन सिंह (जनता दल युनायटेड), हेमंत सोरेन (झारखंड मुक्ती मोर्चा), डी राजा (भाकपा), ओमर अब्दुल्ला (नॅशनल कॉन्फरन्स) आणि मेहबूबा मुफ्ती (पीडीपी) यांचा या समन्वय समितीमध्ये समावेश आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्याचाही या समितीत समावेश करण्यात आला असून त्याच्या नावाची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. ही समन्वय समिती देशभरात फिरून परिस्थितीचा आढावा घेईल आणि त्यानुसार आघाडीचा पुढील अजेंडा ठरणार आहे.

- Advertisment -