घरदेश-विदेशउत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळली; १३ भाविकांचा मृत्यू

उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळली; १३ भाविकांचा मृत्यू

Subscribe

उत्तराखंडमध्ये गंगोत्री धाम येथून दर्शन घेऊन घरी जाणाऱ्या भाविकांच्या बसला अपघात झाला आहे. २०० मीटर खोल दरीमध्ये बस कोसळून अपघात झाला आहे. अपघातात १३ भाविकांचा मृत्यू तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत.

उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातामध्ये १३ भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. उत्तरकाशीतील गंगोत्री महामार्गावर हा अपघात झाला असून २०० मीटर खोल दरीत बस कोसळली. या बसमधून १५ भाविक प्रवास करत होते. भूस्खलनामुळे ही घटना घडली असल्याची माहिती समोर येत आहे.

- Advertisement -

१३ भाविकांचा मृत्यू

गंगोत्री धामवरुन दर्शन घेऊन हे सर्व भाविक घरी परत असताना ही अपघाताची घटना घडली आहे. ऋषिकेश – गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर शंगलाई येथे बसला अपघात झाला. १३ भाविकांचे मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आले आहे. गंभीर जखमी झालेल्या दोन भाविकांना उपचारासाठी देहराडूनमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भूस्खलनामुळे झाला अपघात

महामार्गावर भूस्खलनाची घटना घडल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळली. बस दरीत कोसळून भागीरथी नदीजवळ जाऊन कोसळली. अपघातामधील मृत आणि जखमी उत्तरकाशीमधील रहिवसी आहेत. अपघातामध्ये बसचा चक्काचूरा झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -