धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर बलात्कार; व्हिडिओ केला व्हायरल

अल्पवयीन मुलीवर बलात्कार

देश एकीकडे कोरोना संकटांचा सामना करत आहे. मात्र दुसरीकडे अशा परिस्थिती अनेक गुन्हे घडतं असल्याचं समोर येत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या सीतापूर जिल्ह्यात १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तरुणांनी बुधवारी बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीसह असलेल्या घटनास्थळी असलेल्या पाच जणांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिश्रीख गावात राहणारी ही १३ वर्षाची मुलगी दुपारी अडीचच्या सुमारास घराजवळ असलेल्या शेतात जेवणासाठी गेली होती. घरी परतत असताना या आरोपींना अल्पवयीन मुलीला पकडून तिला एमडी कॉलेजमध्ये घेऊन गेले. त्यातल्या एका आरोपीने तिच्या बलात्कार केला तर बाकीच्या सगळ्यांनी त्यावेळेस व्हिडिओ काढत होते. मग तिला या सगळ्यांनी घरी सांगितल्यास जीवेमारण्याची धमकी दिली.

पीडित मुलगी कशीबशी घटनास्थळावरून घरी परतली. पीडित मुलीने घडलेल्या घटनेची माहिती आईला सांगितली. तिच्यासोबत घडलेली घटना ऐकून आईच्या पायखालची जमीन सरकली. लॉकडाऊन असल्यामुळे काय करायचे हे त्यांना समजत नव्हते.

याच दरम्यान आरोपींनी केलेला बलात्काराचा व्हिडिओ व्हायरल केला. मंगळवारी सकाळी पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींन विरोधात भारतीय दंड संहिता आणि लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (पीओसीएसओ) संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून सहा जणांना अटक केली आहे.


हेही वाचा – Corona: गेल्या २४ तासात देशामध्ये १ हजार ४०० नवे रुग्ण; आकडा २१ हजार पार!