देशात 131 नवीन कोरोनाबाधितांची नोंद, XBB.1.5 आणि BF.7 व्हेरियंटचा कहर

देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. आज देशात 131 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 145 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहिली असता 4,46,81,781 इतकी आहे. तर कालच्या तुलनेत आज देशात 14 रुग्णांची घट झाली आहे. मात्र, जगभरात कोरोनाच्या XBB.1.5 आणि BF.7 व्हेरियंटने कहर केला आहे. ही चिंताजनक बाब असल्याचं म्हटलं जात आहे.

देशातही या व्हेरियंटच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मार्च 2020 नंतर 16 जानेवारी रोजी पहिल्यांदाच देशातील कोरोना रुग्णांची संख्या 100च्या खाली पोहोचली होती. देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा चार कोटींच्या वर गेला आहे. आतापर्यंत देशात 446 हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

सध्या देशात 1 हजार 940 सक्रिय रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत कोरोना विषाणूने 5 लाख 30 हजारांहून अधिक रुग्णांचा बळी घेतला आहे. चीन, जपान, अमेरिका आणि दक्षिण कोरियामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर कोविड चाचणी करण्यात येत आहे. देशात सध्या XBB.1.5 व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या 26 वर पोहोचली आहे. तर BF.7 व्हेरियंटचे भारतात 14 रुग्ण सापडले आहेत.


हेही वाचा : जम्मूच्या नरवालमध्ये लागोपाठ दोन भीषण स्फोट, 6 जण जखमी