घरCORONA UPDATECorona: देशात २४ तासांत पहिल्यांदाच नव्या कोरोनाबाधितांच्या आकडा १३ हजारांहून अधिक!

Corona: देशात २४ तासांत पहिल्यांदाच नव्या कोरोनाबाधितांच्या आकडा १३ हजारांहून अधिक!

Subscribe

देशात पहिल्यांदाच २४ तासांत १३ हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत देशात सर्वाधिक १३ हजार ५८६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून उपचार दरम्यान ३३६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३ लाख ८० हजार ५३२ वर पोहोचला असून मृतांचा आकडा १२ हजार ५७३ झाला आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी २ लाख पेक्षा अधिक रुग्ण बरे झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट ५३.८० टक्के इतका झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात २४ तासांत १० हजार ३८६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून एकूण देशात २ लाख ४ हजार ७११ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या १ लाख ६३ हजार २४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या २४ तासांत १ लाख ६५ हजार ४१२ नमुना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे ७.७८ टक्के रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत ६२ लाख ४९ हजार ६६८ नमुना चाचण्या झाल्या आहेत.


हेही वाचा – जगातील कोरोनाबाधितांची संख्या ८५ लाख पार; आतापर्यंत साडे चार लाखांहून अधिक जणांचे बळी!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -