घरताज्या घडामोडीकेरळ विमान अपघात; १४ मृत्यू, १२३ जखमी तर १५ जणांची प्रकृती गंभीर!

केरळ विमान अपघात; १४ मृत्यू, १२३ जखमी तर १५ जणांची प्रकृती गंभीर!

Subscribe

केरळमधील कोझिकोड धावपट्टीवर मोठा अपघात झाला आहे. कोझिकोडच्या कारीपूर विमानतळावर एअर इंडिया एक्स्प्रेस विमान लँडिंगग करताना घसरले आणि विमानतळालगच्या दरीत कोसळले. या अपघातानंतर विमानाचे दोन तुकडे झाले आहेत. या घटने वैमानिकाचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी जाले आहे. जखमी प्रवशांना बाहेर काढून रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. माहितीनुसार या अपघातात १४ प्रवाशांच्या मृत्यू असून १२३ प्रवाशी जखमी झाले आहेत. तर १५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

- Advertisement -

विमान अपघाताबाबत पंतप्रधान केरळच्या मुख्यमंत्र्यांशी बोलले

पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळचे मुख्यमंत्री विजयन यांच्याशी फोनवरून कारीपूर विमान अपघाताविषयी बोलले. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींना सांगितले की, ‘कोझिकोड आणि मलप्पुरम जिल्हाधिकारी आणि आईजी अशोक यादव यांच्यासह अधिकाऱ्यांचे एक पथक विमातळावर पोहोचले असून मदत कार्य करीत आहेत.’

डीजीसीएच्या मते, एअर इंडिया एक्सप्रेस IX1344,बोईंग ७३७ दुबईहून कालीकटकडे येत होते. विमानात १९१ प्रवासी होते. मात्र मुसळधार पावसामुळे विमान धावपट्टीवर उतरल्यानंतर घसरले आणि दरीत जाऊन पडले. यानंतर या विमानाचे दोन तुकडे झाले. नागारिक उड्डाण मंत्रालयाचे अथिरिक्त डीजी राजीव जैन यांनी सांगितले, विमानात १७४ प्रवासी, १० मुले, २ वैमानिक आणि ५ केबिन क्रू होते.

- Advertisement -

हेही वाचा – केरळमध्ये १९१ प्रवासी असलेले विमान रनवेवरून दरीत कोसळले


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -