घरदेश-विदेशबस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात, १४ जणांचा मृत्यू

बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात, १४ जणांचा मृत्यू

Subscribe

तीर्थयात्रेसाठी राजस्थान अजमेरच्या दिशेने जात होती मीनी बस

आंध्र प्रदेशमधील कुरनूल जिल्ह्यात आज (रविवार १४ फेब्रुवारी) हैदराबाद-बंगळूरू नॅशनल हायवेवर भीषण अपघात झाला. कुरनूल जिल्ह्यातील मदारपुर गावाजवळ बस आणि ट्रकची जोरादार धडक झाली. या धडकेत एकूण १४ लोकांचा मृत्यू झाला. हैदराबाद-बंगळूरू हायवेवर पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातातील जखमींना सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आंध्र प्रदेश पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. या अपघातामधील मृतांमध्ये १ अल्पवयीन मुलगा आणि ८ महिलांचा समावेश आहे. तसेच ४ मुले वाचली असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अपघातग्रस्त परिवार अजमेर दर्गाहला जात होते.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मीनी बसमधून १८ जण प्रवास करत होते. यामध्ये तीन कुटूंब होते. तीर्थयात्रेसाठी राजस्थान अजमेरच्या दिशेने मीनी बसने जात होते. परंतू बस भरधाव जात असताना चालकाला झोप येत होती. चालक झोप येत असताना वेगाने वाहन चालवल्यामुळे हा अपघात घडला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. भरधाव बस रोडवरील डिवायडरला धडकली आणि रस्त्याच्या विरुद्ध दिशेवर पलटली. विरुद्ध दिशेने येत असलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, या धडकेत बसचा चुराडा झाला. बचावकार्य करताना बसला कापून मृतदेह बाहेर काढण्यात आले.

- Advertisement -

मुख्यमंत्री वाई.एस.जगमोहन रेड्डी यांनी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींसाठी दुःख व्यक्त केले आहे. तसेच तातडीने मदतकार्य करण्याचे आदेशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. रेड्डी यांनी शोकग्रस्त कुटूंबाबद्दल शोक व्यक्त केला आहे. तर जखमींना लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. यापूर्वी आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणन जिल्ह्यात झालेल्या अपघातात २२ पर्यटक जखमी झाले होते. तर दोघांचा मृत्यू झाला होता.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -