घरदेश-विदेशKerala BJP Leader Murder : भाजपा नेत्याच्या हत्येप्रकरणी दोन वर्षांनंतर 14 जणांना...

Kerala BJP Leader Murder : भाजपा नेत्याच्या हत्येप्रकरणी दोन वर्षांनंतर 14 जणांना मृत्यूदंड

Subscribe

तिरुवनंतपुरम : 19 डिसेंबर 2021 रोजी केरळातील भाजपाचे ओबीसी शाखेचे नेते रणजित श्रीनिवासन यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील 14 जणांना आता केरळ न्यायालयाकडून मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. केरळ न्यायालयाने प्रतिबंधित इस्लामिक संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) च्या 14 कार्यकर्त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. मावेलिक्काराचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश व्हीजी श्रीदेवी यांच्याकडून हा निकाल देण्यात आला आहे. ज्यामुळे तब्बल दोन वर्षानंतर भाजपा नेते रणजित श्रीनिवासन यांना न्याय मिळाल्याचे बोलले जात आहे. (14 people sentenced to death in Kerala BJP leader’s murder case)

हेही वाचा… BJP on Hemant Soren: आपण यांना पाहिलंत का? मुख्यमंत्र्यांना शोधा आणि मिळवा 11 हजार; भाजपाकडून बॅनरबाजी

- Advertisement -

या प्रकरणाबाबत मृत नेते रणजित श्रीनिवासन यांनी सांगितले की, शिक्षा झालेले सर्व आरोपी ट्रेंड किलर स्क्वाडचा भाग होते. रणजित यांची त्यांच्या आई, पत्नी आणि मुलासमोर ज्या क्रूर आणि निर्दयी पद्धतीने हत्या करण्यात आली, त्यामुळे ही हत्या दुर्मिळ गुन्ह्यांच्या श्रेणीत येते. तर पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, 19 डिसेंबर 2021 रोजी रणजित श्रीनिवासन अलाप्पुझा शहरातील त्यांच्या घरी मॉर्निंग वॉकसाठी तयार होत असताना हल्लेखोर त्यांच्या घरात घुसले. यावेळी त्यांची आई, पत्नी आणि मूलही घरात होते. या हल्लेखोरांनी भाजपा नेत्याला बेदम मारहाण केली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या रणजीत यांचा जागीच मृत्यू झाला. रणजित यांनी नुकतीच भाजपचे उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवली होती. ते पेशाने वकील होते.

धक्कादायक बाब म्हणजे 2021 मध्येच रणजित श्रीनिवासन यांच्या हत्येच्या एक दिवस आधीच म्हणजेच 18 डिसेंबरच्या रात्री एसडीपीआयचे राज्य सचिव के. एस. शान यांची हत्या करण्यात आली होती. एसडीपीआयचे राज्य सचिव शान हे बाईकवरून रात्रीच्या वेळी आपल्या घरी जात असताना त्यांना एका कारने धडक दिली. हल्लेखोर इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी त्यांच्यावर चाकूने अनेक वार देखील केले. ज्यानंतर त्यांना तत्काळ जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, त्यांना मृत सांगण्यात आले.

- Advertisement -

केंद्र सरकारने 27 ऑगस्ट 2022 रोजी PFI वर 5 वर्षांसाठी बंदी घातली. यूएपीए (बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायदा) अंतर्गत सरकारने ही कारवाई केली. पीएफआय व्यतिरिक्त आणखी 8 संस्थांवर कारवाई करण्यात आली. पीएफआय आणि त्याच्याशी संबंधित संघटनांच्या कारवाया देशाच्या सुरक्षेसाठी मोठा धोका असल्याचे सरकारने म्हटले होते. या सर्वांविरुद्ध दहशतवादी संबंध असल्याचे पुरावे सापडले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -