घरदेश-विदेशRajya Sabha : भाजपाकडून राज्यसभेचे 14 उमेदवार जाहीर, महाराष्ट्रातून कोण?

Rajya Sabha : भाजपाकडून राज्यसभेचे 14 उमेदवार जाहीर, महाराष्ट्रातून कोण?

Subscribe

आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून सात राज्यातील उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. एकूण 14 उमेदवार भाजपाकडून जाहीर करण्यात आले आहेत. परंतु, महाराष्ट्रातून अद्याप एकही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही.

नवी दिल्ली : आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून सात राज्यातील उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. एकूण 14 उमेदवार भाजपाकडून जाहीर करण्यात आले आहेत. बिहार, छत्तीसगड, हरियाणा, कर्नाटक, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या सात राज्यांचा या यादीमध्ये समावेश आहे. परंतु, महाराष्ट्रातून अद्याप एकही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. ज्यामुळे आता महाराष्ट्रातील महायुतीत सर्व काही आलबेल आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (4 Rajya Sabha candidates announced by BJP, who is from Maharashtra?)

हेही वाचा… PANKAJA MUNDE : राजकारणात दगाफटका झाला… असं का म्हणाल्या पंकजा मुंडे?

- Advertisement -

देशातील 15 राज्यांमध्ये राज्यसभेच्या 56 जागांसाठी मतदान होणार आहे. 27 फेब्रुवारीला ही मतदान प्रक्रिया होणार असून निवडणूक आयोगाने मागील आठवड्यात गुरुवारी (ता. 8 फेब्रुवारी) याबाबत अधिसूचना जारी केली होती. राज्यसभेसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारीचे अर्ज दाखल करता येणार आहेत. तर 20 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांना त्यांची नावे मागे घेता येणार आहेत. त्यानुसार आता भाजपाकडून सात राज्यातून 14 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आलेली आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे एकाही केंद्रीय मंत्र्याला राज्यसभेचे तिकीट दिलेले नाही. यावेळी जीतन राम मांझी यांचे तिकीटही भाजपाकडून रद्द करण्यात आले आहे. काही केंद्रीय मंत्र्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. परंतु, भाजपाने काही केंद्रीय मंत्र्यांचा कार्यकाळ संपत आलेला असला तरी त्यांना उमेदवारी जाहीर केलेली नाही.

भाजपाकडून जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्रातील एकाही मंत्र्यांचे नाव नाही. ज्यामुळे महायुतीमध्ये सर्व काही सुरळीत आहे की नाही, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. कारण महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सहभागी झाल्यापासून यांच्यातील अंतर्गत वाद समोर येऊ लागले आहेत. तर नुकतेच कल्याणमध्ये भाजपाच्या आमदाराने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर केलेल्या गोळीबाराच्या घटनेचा देखील यावर परिणाम झाला आहे का? अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. पण एकीकडे पहिल्या यादीमध्ये कोणत्याही केंद्रीय मंत्र्याला भाजपाने संधी न दिल्याने महाराष्ट्रातून नेमके कोणाचे नाव राज्यसभेसाठी देण्यात येणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे.

- Advertisement -

तर भाजपाने कर्नाटकातून नारायण कृष्णसा भांडगे, छत्तीसगडमधून राजा देवेंद्र प्रताप सिंह आणि पश्चिम बंगालमधून सामानी भट्टाचार्य यांना उमेदवारी घोषित केली आहे. तर चौधरी तेजवीर सिंग, साधना सिंह, अमरपाल मौर्य, संगीता बलवंत, सुधाशुं त्रिवेदी, आर. पी. एन. सिंह, आणि नवीन जैन यांना उत्तर प्रदेशमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बिहारमधून डॉ. धर्मशीला गुप्ता आणि डॉ. भीम सिंह, हरियाणामधून सुभाष बराला यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पण आता महाराष्ट्रातील महायुतीतून कोणला राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात येतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -