घरताज्या घडामोडीशाहीन बागेत जमावबंदी लागू, आता आंदोलनाचं काय होणार?

शाहीन बागेत जमावबंदी लागू, आता आंदोलनाचं काय होणार?

Subscribe

गेल्या दोन महिन्यांपासून चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेल्या दिल्लीच्या शाहीन बाग परिसरामध्ये अखेर आज दिल्ली पोलिसांनी जमावबंदीचं कलम १४४ लागू केलं आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून जास्त काळ दिल्लीच्या शाहीन बाग परिसरामध्ये सीएए, एनआरसी आणि एनपीआरच्या विरोधात मोठ्या संख्येने नागरिक आंदोलनाला बसले आहेत. त्यामध्ये मुस्लीम बांधवांची संख्या जास्त असली, तरी सर्वच धर्माच्या लोकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मात्र, चार दिवसांपूर्वी पूर्व दिल्लीतील जाफराबाद आणि आसपासच्या परिसरामध्ये सीएएचे समर्थक आणि विरोधक यांच्यात झालेल्या हिंसाचारामध्ये ४०हून अधिक लोकांना जीव गमवावा लागल्यामुळे परिस्थिती चिंताजनक झाली होती. त्यामुळे अखेर दिल्ली पोलिसांनी शाहीन बाग परिसरामध्ये जमावबंदी लागू केली आहे. त्यामुळे आता आंदोलनाचं काय होणार? याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. दरम्यान, हिंदू सेनेने आंदोलन स्थळ रिकाम करण्याची दिलेली हाक मागे घेतल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात राहावी, यासाठी हा निर्णय घेतला्याचं दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

- Advertisement -

हिंदू सेना नावाच्या एका गटाने शनिवारी शाहीन बागेतील आंदोलकांना हटवण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना केलं होतं. रविवारी सकाळी १० वाजता या आंदोलकांना हटवण्यात येईल, असं देखील या गटाने जाहीर केलं होतं. मात्र, नंतर त्यांनी ते आवाहन मागे घेतलं. तरीदेखील, दिल्ली पोलिसांनी सुरक्षेचा उपाय म्हणून या भागामध्ये कलम १४४ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, सीएएच्या मुद्द्यावरूनच दिल्लीच्या काही भागामध्ये गेल्या चार दिवसांपासून हिंसाचाराच्या घटना समोर येत होत्या. पण आता या भागातली परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असून सामान्य जनजीवन सुरळीत सुरू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

- Advertisement -

आंदोलन परिसरात कलम १४४ लागू केल्यामुळे आता आंदोलनाचं काय होणार? आंदोलक कोणती भूमिका घेणार? याविषयीची चर्चा सुरू झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -