घरCORONA UPDATECorona Update: देशात २४ तासांत १४ हजार ९३३ नवे कोरोनाचे रुग्ण, ३१२...

Corona Update: देशात २४ तासांत १४ हजार ९३३ नवे कोरोनाचे रुग्ण, ३१२ जणांचा मृत्यू!

Subscribe

देशात कोरोना विषाणूचा फैलाव झपाट्याने वाढत आहे. मागील २४ तासांत १४ हजार ९३३ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून ३१२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे नोंद झाले आहे. त्यामुळे आतापर्यंत देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ४ लाख ४० हजार २१५वर पोहोचला असून यापैकी १४ हजार ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत २ लाख ४८ हजार १९० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे सध्याचा रिकव्हरी रेट हा ५६.३७ टक्के आहे. तर सध्या १ लाख ७८ हजार १४ जणांवर उपचार सुरू आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

- Advertisement -

जगातील कोरोनाबाधितांच्या यादीत भारत देश चौथ्या क्रमांकावर आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, देशातील मृतांचा आकडा हा रशिया, पेरू, चिली, इराण, तुर्की, पाकिस्तान, कॅनडा या देशांपेक्षा जास्त आहे. देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू, गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये आढळले आहेत. सध्या महाराष्ट्र आणि दिल्लीत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या यादीत दिल्लीने तामिळनाडूळा मागे टाकले आहे. दिल्ली एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ६२ हजार ६५५, तर तामिळनाडूचा ६२ हजार ८७ आहे.

सोमवारी महाराष्ट्रात तब्बल ३ हजार ७२१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ३५ हजार ७९६ वर पोहोचला आहे. यापैकी ६१ हजार ७९३ रुग्णांवर उपचार सुरू असून ६७ हजार ७०६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे सध्या महाराष्ट्रात कोरोना रुग्णांपेक्षा बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा जास्त आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अमेरिकेने भारतीय आयटी व्यावसायिकांना दिला झटका, एच १-बी व्हिसा केला निलंबित


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -