घरदेश-विदेशस्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावर खलिस्तानचा झेंडा फडकवण्याचा कट

स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावर खलिस्तानचा झेंडा फडकवण्याचा कट

Subscribe

अमेरिकेत सक्रिय असलेल्या खलिस्तान दहशतवादी संघटनेला पाठिंबा देणाऱ्या ‘सिख फॉर जस्टिस’ ने १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर खलिस्तानचा झेंडा फडकवण्याचे आवाहन केले आहे. तसेच झेंडा फडकणाऱ्यांना एक लाख २५ हजार डॉलरचे बक्षिसही जाहिर केले आहे. या घोषणेनंतर दिल्ली पोलीस अधिक सक्रिय झाली असून आयबी संघटनेने अलर्ट जारी केला आहे. भारताने या संघटनेवर २०१९ मध्ये बंदी घातली आहे.

संघटनेचे प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नून म्हणाले की,

१५ ऑगस्ट हा शीख बांधवांचा स्वातंत्र्य दिन नाही. १९४७ मध्ये झालेल्या फाळणीमुळे शीख समुदायाला मोठ्या वेदनेतून जावे लागले होते. आमच्यासाठी परिस्थिती अद्याप बदलली नाही. फक्त राज्यकर्ते बदलले आहेत. भारतात आम्हाला हिंदू म्हणून गृहित धरले जाते आणि पंजाबच्या साधन संपत्तीचा वापर इतर राज्यांच्या विकासासाठी करण्यात येत असल्याचे त्याने म्हटले. हा आमच्यावरील अन्याय असून अन्य राज्यांचे हित पाहिले जात आहे. आम्हाला वास्तविक स्वातंत्र्याची आवश्यकता असल्याची मल्लिनाथीही त्याने केली आहे.

- Advertisement -

दरम्यान गुरपरवंत सिंग याच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात सहा एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. कोरोना संकटाच्या काळात राजकीय जनमत करण्याची मागणी त्याच्याकडून करण्यात येत असून त्याशिवाय फोन, ई-मेल द्वारे शीख समुदायासाठी वेगळ्या राज्याची मागणी करण्यात येत आहे. गुरपरवंत सिंगने केलेल्या दाव्यानुसार, त्याची ही मागणी मानवाधिकारांच्या जागतिक जाहीरनाम्यानुसार योग्य आहे. लाल किल्ल्यावर खलिस्तानी झेंडा फडकवण्याच्या त्याच्या घोषणेनंतर आता दिल्ली पोलीस व सुरक्षा यंत्रणा अधिक सक्रिय झाल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या ई-मेलची तपासणी करण्यात येत आहे. त्याशिवाय त्याने दिलेल्या धमकीविरोधात त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात येणार आहे.

हेही वाचा –

कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये ठाण्यात अनधिकृत बांधकामांना उधाण!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -