घरताज्या घडामोडीअजबच! रोपं खाल्ल्याने बकऱ्यांना केली अटक, ठोठावला ३ हजार रुपयांचा दंड!

अजबच! रोपं खाल्ल्याने बकऱ्यांना केली अटक, ठोठावला ३ हजार रुपयांचा दंड!

Subscribe

तेलंगणात एक अजब घटना घडली आहे. तेलंगणा मध्ये १५ बकऱ्यांनी रोपं खाल्ल्याने चक्क ३ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ही पूर्णपणे सत्य घटना आहे. वास्तविक, तेलंगणाच्या भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी १५ बकऱ्यांना रोपं खाल्ल्याने अटक केली आहे. तसेच या १५ बकऱ्यांवर ३ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

द ट्रिब्यून दिलेल्या वृत्तानुसार, भद्रादी कोठागुडेम जिल्ह्यात येल्लेंडू मध्ये वृक्षारोपण मोहीमेखाली लागवड केलेली रोपं १५ बकऱ्यांनी खाल्ली. त्यामुळे या १५ बकऱ्यांना ताब्यात घेण्यात आले.

- Advertisement -

गुरुवारी येल्लेंडू मधील नगरपालिकाच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले की, काही बकरी रोपांचे नुकसान करीत आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी या बकऱ्यांवर त्वरित कारवाई केली आणि ९ बकऱ्यांना गुरुवारी ताब्यात घेतले आणि उर्वरित ६ बकऱ्यांना शुक्रवारी ताब्यात घेतले. आता या सर्व १५ बकऱ्यांना नगरपालिकेत ठेवले आहे. कर्मचारी त्यांना जेवण देत आहेत. तसेच बकऱ्यांच्या मालकाला नोटीस बजावण्यात आली आहे. परंतु अद्याप या बकऱ्यांना कोणीही घ्यायला आले नाही आहे.


हेही वाचा – वैज्ञानिकांनी तयार केले कोरोना टेस्टिंगचे नवे तंत्र, अवघ्या ३६ मिनिटांत रिपोर्ट येणार

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -