घरदेश-विदेशउत्तर प्रदेशमध्ये १५ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशमध्ये १५ जणांचा मृत्यू

Subscribe

सुधारीत नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात तीव्र आंदोलने करण्यात येत असून शनिवारी उत्तर प्रदेशमध्ये 15 आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. तर हिंसक आंदोलन केल्याप्रकरणी ७०५ जणांना अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये १० डिसेंबरपासून सुधारीत नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी आंदोलनातील हिंसक घटनांची माहिती दिली असून राज्यपाल आपला अहवाल केंद्र सरकारकडे पाठवणार आहेत.

हिंसाचाराच्या घटना पाहता, कानपूरमध्ये दंगल नियंत्रण पथक, वज्र वाहनाच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. कानपूरमध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान, एक पोलीस कर्मचारी जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. शनिवारीदेखील कानपूरमध्ये आंदोलनादरम्यान हिंसाचार उफाळून आला. जमावाने यतीमखाना पोलीस ठाण्याच्या बीट चौकीला आग लावण्याची घटना घडली. त्याशिवाय आंदोलनकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आली.

- Advertisement -

तर काही ठिकाणी पोलिसांच्या वाहनांना आगी लावण्यात आल्या. पोलिसांनी हिंसक जमावास पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. यापूर्वी कानपूरमध्ये समाजवादी पक्षाचे आमदार अमिताभ वाजपेयी यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन समाजवादी पक्षाचे नेते इरफान सोळंखी यांना आंदोलन स्थळाहून जाण्यास सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -