घरCORONA UPDATEधक्कादायक! २ महिन्यांत १५ लाख आंतरराष्ट्रीय प्रवासी भारतात आले

धक्कादायक! २ महिन्यांत १५ लाख आंतरराष्ट्रीय प्रवासी भारतात आले

Subscribe

केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी धक्कादायक माहिती दिली आहे.

भारताला करोनाच्या संसर्गाने वेढले असून भारतात नक्की किती जणांना याची लागण झालेली आहे याची अद्याप निश्चित आकडेवारी समोर आलेली नाही. केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारे शर्थीचे प्रयत्न करत असतानाच केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी मागील २ महिन्यांमध्ये भारतात तब्बल १५ लाख आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी प्रवास केल्याची धक्कादायक माहिती दिली आहे. त्यामुळे हे प्रवासी करोनाबाधित देशांमधून आले होते का? सध्या ते कुठे आहेत? त्यांना करोनाची लागण झाली आहे का? त्यांच्यामुळे स्थानिकांमध्ये संसर्ग सुरु आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधणे आता सरकारसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. यात सर्वात जास्त धोका पंजाब राज्याला बसण्याची शक्यता आहे. तशी भीती या राज्याचे आरोग्यमंत्री बी एस सिद्धू यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांना लिहिलेल्या पात्रात व्यक्त केली आहे या महिन्यात जवळपास 90,000 अनिवासी भारतीय (अनिवासी भारतीय) परत आले आहेत.


हेही वाचा – Coronavirus: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांना करोनाची लागण

पंजाबमध्ये जास्तीत जास्त अनिवासी भारतीय आहेत. बर्‍याचजणांना कोविड -१९ ची लक्षणे आहेत. त्यामुळे राज्यात करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होणार आहे. या सर्वांमध्ये बरेच लोक असे आहेत ज्यांना उपचारासाठी ठेवले गेले आहे. परंतु बर्‍याच लोकांनी त्यांचा प्रवास इतिहासही लपविला आहे. त्यामुळे केंद्राने पंजाबच्या सुरक्षा, स्वच्छता आणि वैद्यकीय तयारी मोहिमेसाठी १५० कोटींची मदत करावी, अशी मागणी केली आहे. हीच परिस्थिती केरळ राज्याची आहे. या राज्यातही मोठ्या संख्येने अनिवासी भारतीय असून हे सर्व युरोपियन देशांमध्ये राहत असतात. करोनाचा जागतिक स्तरावर संसर्ग सुरु झाल्यानंतर केरळमध्येही मोठ्या संख्येने अनिवासी भारतीय केरळमध्ये परतले आहेत. त्यामुळेच केरळ मध्ये आता देशातील सर्वाधिक करोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. देशात पहिला करोनाचा रुग्णही केरळमध्येच आढळून आला होता.

- Advertisement -

मुंबईतही देशाची आर्थिक राजधानी असल्याने मोठ्या संख्येने लोकांची परदेशातून ये-जा सुरु असते. त्यामुळे मागील २ महिन्यांत मुंबईतही परदेशातून आलेल्या नागरिकांमधून करोनाचा संसर्ग झाला असण्याची भीती व्यक्त होत आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -